सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

परतुर महेश्वरी महिला मंडळाच्या तालुकाध्यक्षपदी सुनीता सोनी तर सचिव पदी मंगल पोरवाल

    परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण
  दिनांक 26 रोजी परतूर येथील बालाजी मंदिर मध्ये परतुर माहेश्वरी महिलांचा एक बैठक झाली या बैठकीमध्ये नवीन कार्यकारणीची निवड करण्यात आली ही निवड तीन वर्षाकरिता निवड करण्यात आलेली आहे या निवडीमध्ये तालुका अध्यक्षपदी सौ सुनिता सोनी तर सचिव पदी सौ मंगल पोरवाल यांची निवड करण्यात आली
       जिला उपाध्यक्ष पदी ममता मंत्री उपाध्यक्ष सौ सीमा राठी व सौ प्रेमा दरगड़ सहसचिव किरण मालपानी कोषाध्यक्ष सौ कल्पना लोया सहकोषध्यक्ष सौ किरण तापड़िया संघटन मंत्री सौ कविता दरगड़ सौ सीमा भूतड़ा तर सल्लागर पदी सौ विमलताई जेथलीया रेखा झंवर सौ ममता मंत्री यांची निवड यावेळी करण्यात आली
  ही निवड जालना जिल्हा सभा माहेश्वरी महिला मंडळ व परतुर सभा माहेश्वरी महीला मंडळ यांच्या पदाधिकाऱ्यानी केली 
   या निवडी बदल माहेश्वरी महीला मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत