न्यू वंडर इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये गुरु पौर्णिमेच्या कार्यक्रम संपन्न

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा  न्यू वंडर इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज परतुर मध्ये गुरुपौर्णिमा निमित्त "जीवनातील गुरुचे महत्व" या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धेमध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी भाग घेतला तसेच इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनींनी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा या मंत्रावर शास्त्रीय पद्धतीने नृत्य सादर करून गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त केली.  नृत्य दरम्यान इयत्ता दहावीची विद्यार्थिनी संस्कृती संतोष झरेकर हिने जीवनातील गुरुचे महत्व सांगून शाळेतील सर्व शिक्षक वृंदाचे आभार मानले. या कार्यक्रमा दरम्यान संस्थेचे अध्यक्ष  नारायण  सोळंके ,संस्थेच्या सचिव छाया बागल तसेच व्हॉइस प्रिन्सिपल पूजा मोरे, शिक्षकवृंद व  शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

परतुरात हनुमान जन्मोत्सव निमित्त भव्य शोभा यात्रा


परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
    हनुमान जन्मोत्सव निमित्ताने परतूर शहरात गाव भागात  आगदि कमी वेळात भव्य दिव्य शोभा यात्रा काढण्यात आली होती.       
           दरम्यान ,यावेळी सहा फुटांची हनुमानाची मूर्तीची ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवनुक काढण्यात आली.शहरातील भाविकांनी मिरवनुक मार्गावर रांगोळी काढल्या होत्या व ठीक ठिकाणि पुष्पवृष्टी करून पूजन करण्यात आले.यावेळीं मोठ्या संख्येने हनुमान भक्तांची उपस्थिती होती.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेचे सावता काळे,रामेश्वर उबाळे,रोहित कपाळे,कृष्णा तरोडकर, कैलास मुजमुले, अमृत बागल, राधेश्याम राऊत, विष्णु इगळे, अजय ईगळे, मोहन मुजमुले, अनिल सागुळे, प्रल्हाद ईगले , ऋषी काळे, नागेश तराशे, कुमार हनवते, लखन अग्रवाल, ऋषी कऱ्हाले, श्रीकांत उबाळे यांनी परिश्रम घेतले.



Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत