देव देश धर्म टिकवण्यासाठी जाती पातीचे बंधने तोडून एक व्हा प पू आनंद चैतन्य बापूचा संदेशमाळेगाव येथील तीन दिवसीय सत्संगाचा समारोपतळणी रवी पाटिल 
    मनुष्याला स्वार्थ आणि अहंकाराचा रोग लागलेला आहे रावणाला झालेला अहकार त्याच्या सर्वनाशाचे कारण झाले सर्व सताचे सुख असुन सुध्दा जर तो रावण सपल्या जातो तेथे तुम्ही आम्ही कोण आहोत असे प्रतिपादन प पू आनंद चैतन्य बापूनी केले 
मंठा तालूक्यातील माळेगाव येथे गेल्या तीन दिवसापासून चालू असलेल्या गीता रामायण सत्संगाची सांगता काल शनिवारी अनेक मान्यवराच्या व हजारो च्या सख्येत उपस्थीत असलेल्या भक्ताच्या उपस्थीतीत करण्यात आली हनुमान जन्मोसव व विश्व बंजारा दिवसाच्या निमित्याने या गीता रामायण सत्संगाचे आयोजन इजि प्रा माधव चव्हाण यांच्याकडून करण्यात आले होते यावेळी बापूनी उपस्थीतांना मञमूग्ध केले 

आपली सनातन सस्कृती ही खूप चांगली आहे तीचा विसर पडू देऊ नका संत सेवालाल महाराजाने मोठया सघर्षातून आपली संस्कृती टिकून ठेवली आहे सनातन धर्मच आपल्या सगळ्याचे मूळ आहे बंजारा समाजाचा इतिहास हा सघर्षाचा ईतिहास आहे आपल्या पूर्वजानी केलेल्या सघर्षामुळेच आपण आज सुस्थीतीत आहोत कोणाच्या मोहाला प्रलोभनाला बळी पडू नका विश्व बंजारा दिवस हा क्रांती केली म्हणून आपण तो साजरा करतोय सरदार वल्लभभाई पटेलानी विश्व बंजारा दिवसाची मुहुर्तमेढ केली आहे सपूर्ण भारत स्वातत्र्य झाल्यावर सुध्दा मराठवाड्याला स्वांतत्र्य मिळाले नाही मराठवाडयाला कायम पारतत्र्यात ठेवण्याचा निजामाचा डाव होता नेहरूजी विदेशात गेल्यावर सरदार पटेलानी हैदराबादच्या निजामाला पळवळ्याचे ठरवले त्या सपूर्ण काळात सैन्याला अन्नधान्य व इतर सामग्री देण्याच मोठे काम प्रत्येक तांड्यातील बंजाराने केले व त्या लढ्यात अनेक बजारा बांधवांना हौतात्म आले व निजामाला पळवून लावले हा ईतिहास बंजारा समाजाचा सघर्षाचा आहे त्याला कोणी डाग लावू नका व लावू देऊ नका म्हणून त्या वेळेस पासून सरदार पटेलाच्या पूढाकाराने विश्व बंजारा दिवस साजरा करण्याची प्रथा आहे 

अनेक तरुण सध्या दारूच्या आहारी गेला आहे घरातील वडीलधार्यानी याकडे लक्ष दिले पाहीजे आपली संस्कृती दारू पिण्याची नाही कष्ट करा शिका मोठ व्हा प्रत्येक क्षेत्रात सध्या युवकांना संधी आहे तुमचे चातुर्य त्या ठिकाणी सिध्द करा आपल्या पूर्वजांना शोभेल असेल काम आपण केले पाहीजे या विज्ञान युगात अनेक पाऊल आपण पूढे टाकत असलो तरी आपल्याला देव देश आणि धर्माचा विसर पडता कामा नये देव देश आणि धर्म टिकवण्यासाठी आपल्या संत सेवालाल महाराज छ्ञपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज महारणा . प्रताप सुभाष चद्र बोस चद्रेशेखर आझाद भगतसिग सुखदेव राजगुरु बिरसा मुन्डां विर सावरकर यानी फार मोठे बलिदाना या भारतमाते साठी दिलय त्या बलीदानाचा विसर पडू देऊ नका आता कोठे भारताचा भाग्योदय जगात चमकत आहे त्याचे साक्षीदार व्हा त्याचे भागीदार व्हा अधर्माची साथ सोडून धर्माची कास धरा येणारा काळ हा आपल्यासाठी पाहीजे असेल तर आपल्यात एकी अवश्यक आहे

जातीपातीच्या बंधनात अडकू नका एक हिन्दूं म्हणुन या भगव्या ध्वजाखाली या राजकीय जोडे बाजूला ठेवा विविधतेत आपली एकता आणखी मजबूत करा जगाच्या पाठीवर एकच अशी सस्कृती आहे ती म्हणजे आपली वैदीक हिंन्दू संस्कूती ती कोणाच द्वेश मत्सर करायला शिकवत नाही सध्याचा काळ हा आपल्यासाठी आवाहनाचा जरी असला तरी ते आवाहन परत लावण्यासाठीची क्षमता या नव भारतात आहे गरज आहे ती आपल्या स्वच्छ चारीत्र्याची व निर्व्यसणीपणाची तरच आपण टिकून राहून 

धर्माच्या कामासाठी जशी अर्जुनाला साथ कृष्णाची होती होती तशी साथ आपल्याला प्राप्त करायची असेल तर आपल्याला कामही धर्माचेच करावे लागेल ते नितीने करावे लागेल अधर्माच्या बाजूने देव कधीच उभा राहत नाही जो न्याय निती आचरण चारीत्र्य धर्म या नितीने वागतो जपतो त्याच्या पाठीमागे कृष्ण उभा राहील्या शिवाय राहणार नाही असे प्रतिपादन आनंद चैतन्य बापूनी समारोप प्रसंगी केले 
यावेळी विषेश उपस्थीती व आशीर्वाद देण्यासाठी प पू योगानदं बापू दहीफळ खंदारे आश्रम हे सुध्दा समोरप प्रसगी उपस्थीत होते


सत्संगाच्या समारोप प्रसंगी जीवंत भारतमातेचा सुंदर देखावा नजरेत भरण्यासारखा होता अनेक ञासातून भारत मातेला मुक्त करून अखंड भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी तीला परत सर्वाच्य सिहांसनावर बसणाच्या संदेश या सत्संगाच्या माध्यमातून देन्यात आला 


सत्सगांच्या समोराप प्रंसगी इजि प्रा माधव भाऊ चव्हाण यानी प्रास्ताविकात समाजाच्या अनेक अडचणी मांडल्या धार्मीक कामात आपल्याला असलेली आवडीमुळे हा सत्संग आनंदात पार पडला पंचक्रोशीत अनेक ग्रामस्थाच्या अडचणी आहेत त्या सोडवण्याचा आपला प्रामाणीक प्रयत्न असून त्याची सुरुवात लवकरच करणार असल्याचे इजि प्रा माधव भाऊ चव्हाण यानी सांगीतले 

समारोप प्रसगी राज्याचे मत्री संजय राठोड परतूर मंठा सघाचे आमदार बबनराव लोणीकर माजी आमदार सुरेश जेथलीया व अन्य राजकीय पदाधिकार्याची मोठी उपस्थीती होती महाप्रसदाने सांगता झाली

Popular posts from this blog

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.