सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

जिल्हा व तालुक्यातील खेळाडूंनी मिळालेल्या चा संघी फायदा उचलावा : संतोष शर्मा

परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
    सध्या IPL मुळे क्रिकेट चे वेगळेच फिव्हर चालू आहे. 
त्यातच  कडक उन्ह पडताना दिसून येत आहे उन्हाची तीव्रत जवळ जवळ 40 ते 44 डिग्री सेल्सीयस आहे तरी पण क्रिकेट खेळाडू वर याचा  काही परीणाम दिसून येत नाही खेळाडू आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करताना दिसत आहे 
 खेळाडू शहर स्तरावरील असो की गाव खेड्यातील तालूक्या स्तरावरील असो  त्याला फक्त गाठायचे म्हणजे आ-आपल्या राज्य स्तरावर म्हणजे ( रणजी) स्तर भारतीय स्तर ...आणि याची सुरवात होती ती म्हणजे जिल्हा स्तरावरून , महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने MCA असोसिएशन हे इनवेटेशन लीग चे आयोजन करतात त्यात वयोगटची एक मर्यादा ठराविक असते त्यात अंडर १४, १६ व १९ चा समावेश असतो त्याची सर्व जवाबदारी जिल्हा क्रिकेट असोशियशन यांच्या कडे नेमली जाते त्यात सलेक्शन ट्रायल पासून तर त्यांच्या जिल्ह्याच्या अंतर गत उकृष्ट खेळाच्या प्रदर्शनाने  खेळाडू आपले कौशल्य दाखवीत असतात  खेळाडू आपल्या सलेक्शन पूर्तते न खेळता राज्य स्तरावर  आपल्याला भेटलेल्या संधी चा फायदा उचलून खेळाडूनी सलेक्टर ला आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत अकर्षीत करताना दिसतात आणि आपल्या ला मिळालेल्या संधी चा सोन कसं करावे  हे बघावे
मी जिल्हा क्रिकेट असो जालना चे आभार मानतो जालना क्रिकेट असो चे अध्यक्ष व सचिव यांचे धन्यवाद करतो
त्यांनी जिल्हा स्तरावरील तालुक्यातील खेळाडू ना खेळायची संधी दिली. जिल्हा व तालुका स्तरावरील खेळाडूनी या संधी चा उत्कृष्ट  खेळाचे प्रदर्शना ने खेळाडनी सलेक्टर चे मन जिकावे राज्य स्तरावरून भारतीय स्तरावर खेळाडू ने आपल्या जिल्ह्याच - तालुक्या च नाव उज्वल करावं आपल्याला मिळालेल्या संधी च सोन कराव आस शेवटी 
संतोष शर्मा यांनी सांगितले

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत