तळणी पूर्णा नदीपाञातून बेसूमार वाळू ऊपसा पोलीस प्रशासनाचा आशीर्वाद महसुल प्रशासनाची मुंक संमती ?





तळणी : (रवि पाटील )तळणी परीसरातील पूर्णा नदीपाञातुन सध्या वाळू ऊपश्याचा राञीस खेळ चालू असल्याने शासनाच्या लाखो रुपयाच्या महसुल ला चुना लावण्याचे काम होत असून गोर गरीब मानसांना सोन्याच्या भावात वाळू खरेदी करावी लागत आहे सद्यस्थितीत तळणी परीसरातील देवठाणा ऊस्वद कानडी सासखेडा टाकळखोपा वाघाळा भुवन वझर सरकटे केधळी पोखरी व अन्य ठिकाणावरून वाळू ची चोरी होत असल्याने वाळू माफीयांचे फावत आहे 
वाळू उत्खननाच्या नविन धोरणात जास्त सहभाग लिलावधारकांनी घेतला नसल्याने परीणामी नविन धोरणानुसार वाळूचे लिलाव रखडले वाळूचे लिलाव म्हणजे महसुल व पोलीस यञणे सांठी दिवाळी दसराच असतो परतूं या वर्षी नवीन धोरणामुळे संगळ्याची फजिती झाल्याचे दिसून येते 

सद्य |थितीत पूर्णा नदीकाठावरच्या गावातून वाळू उपसा सुरू आहे काही ठिकाणी जेसीबी यञांणे वाळू चे उत्खनन चालू आहे याची इंत्यंभूत माहीती महसूल व पोलीस प्रशासनाकडे उपलब्ध असताना सुद्धा ठोस कारवाई होताना दिसत नाही सध्य |स्थितीत मंठा तहसील दार कैलास चंद्र वाघमारे हे अँक्शन मोड वर असलेले अचानक भूमीगत झाल्याने वाळू माफीयांचे फावत आहेत गेल्या तीन ते चार दिवसापासून पूर्णा नदीकाठावरच्या गावामधून बेसूमार वाळू उपसा चालू असून प्रशासन सुस्त आहे या अवैध वाळू उपश्याच्या विरुद्ध कारवाया केल्या असल्या तरी त्या कारवाया सतत होणे गरजेचे आहे 

पूर्णा नदी पाञातील वझर सरकटे केधळी पोखरी भूवन वाघाळा सासखेडा लिबखेडा कानडी देवठाणा उस्वद या व इतर गावातून वाळू उपसा जोरात चालू आहे 

तहसीलदार भूमिगत

आठ दिवसापूर्वी कारवाया करणारे मंठा तहसीलदार गेल्या चार दिवसापासून भूमीगत झाल्यापासुन महसूलचे पथकेही भूमीगत कसे ?
यामुळे माफीयांत नवचैतन्य आले असले तरी शासनाच्या लाखो रुपयाच्या महसुला चुना लावण्याचे काम होत आहे चोरुन आणलेली वाळू मनमानी भावाने विक्री होत असून सर्वसामान्याना ती घ्यावी लागत आहे शासनाच्या नविन धोरणात सहभागी न होताच वाळू चोरी करुन आपलीच कशी चालतेय याचा प्रत्यय सध्या सर्वसामान्य नागरीकांना येत आहे

सद्याच्या स्थितीत मंठा शहरातून सुध्दा राञीच्या वेळी वाळू वाहतुकीचे वाहने व त्याची माणसे दिसून येत आहे याकडे महसूल पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष आहे

अवैध वाळू उपश्या सदर्भात मंठा तहसीलदार यांना अनेक वेळा कल्पना दिली गावात राञीच्या वेळी अवैध वाळूच्या वाहनाचा धुमाकूळ सुरु आहे यावर कारवाई होणे गरजेचे आहे नसता ही वाहने स्वःत अडवणार

गौतम सदावर्ते सरपंच तळणी


अवैध वाळू उपसा होऊ नये म्हणून तालूका स्तरावर तहसीलदार व पोलीस निरीक्षक यानी लक्ष घालणे गरजेचे आहे या वाळू उपश्यासदर्भात जिल्हाधिकार्याना भेटून तक्रार करणार असल्याचे माजी मंञी विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी सांगीतले

Popular posts from this blog

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश