सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

जालना जिल्हा मध्य गोरसेनेच्या वतीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन



परतूर प्रतिनिधी कैलास चव्हाण 
  जालना जिल्ह्यातील परतूर व मंठा येथे गोर सेनेच्या वतीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आले.. विमुक्त जाती (अ) प्रवर्गातील होत असलेली बोगस राजपूत भामटा परदेशी,मीना, छप्परबंद, समाजाशी घुसखोरी थांबविण्यासाठी नेमण्यात आलेली एसआयटी चौकशी पूर्ववत लागू झाली पाहिजे या मागणी साठी आंदोलन करण्यात आले.. महाराष्ट्रातील २० जिल्ह्यात हे आंदोलन करण्यात आले असल्याचे गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण यांनी सांगितले.
 मागील अनेक वर्षापासून विमुक्त जाती (अ )प्रवर्गामध्ये अवैधरित्या व संवैधानिक मार्गाने जात वैधता प्रमाणपत्र मिळवणारे राजपूत ,परदेशी, मीना व छप्परबंद लोकांनी फार मोठ्या प्रमाणात घुसखोरी केलेली आहे त्यामुळे मूळ विमुक्त जाती अ प्रवर्गातील लोकांचे आरक्षण संपूर्णतः धोक्यात आलेले आहेत त्यामुळे विमुक्त जाती-अ प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत आहे तसेच या प्रयोगातील लोकांना नोकरीच्या ठिकाणी सुद्धा अन्याय सहन करावा लागत आहे.
ही समस्या सोडविण्यासाठी गोरसेनेच्या वतीने २०१९ पासून वेगवेगळ्या स्वरूपाची आंदोलने केल्या गेलीत, तसेच सध्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये विधानपरिषदेचे आमदार माननीय राजेश राठोड यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून आवाज उठवला असताना शिंदे फडणवीस व अजित पवार सरकारने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषीवर कारवाई करण्यासाठी SIT नेमणूक करण्याचे आश्वासन दिलेले असताना पुन्हा काल ३ ऑगस्ट रोजी SIT चौकशी रद्द करण्यात येत आहे असे सांगितले गेले. त्यामुळे ही SIT कोणत्याही परिस्थितीत रद्द करू नये म्हणून गोरसेनेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे. निवेदनावर
जिल्हाध्यक्ष सुभाष राठोड,जिल्हा संघटक गोविंद राठोड, तालुकाध्यक्ष संदीप जाधव, अजय राठोड,अर्जुन राठोड, यांच्या सह्या आहेत.
     तसेच राजपूत भामटा प्रकरण विधानसभेत का उपस्थित केला म्हणून देविचंद बारवाल यांच्या वर कायदेशीर कार्यवाही करून गुन्हा दाखल करण्यात यावे आशयाचे एक नीवेदन  गोर सेना च्या वतीने आष्टी पो स्टेशन येथे  देण्यात आले या वेळी
   गोर सेना शहर अध्यक्ष संजय चव्हाण , सरपंच निरदास राठोड़ सरपंच सिताराम राठोड़ ज्ञानेश्वर पवार अर्जून राठोड़ नायक अंकुश आड़े बालाजी आडे भारत चव्हाण अविनाश राठोड़ योगेश आड़े शिवनारायण राठोड़ संजय राठोड़ नवनाथ आठे प्रधान राठोड़ विलास राठोड़ के के राठोड़ भाऊ साहेब आडे राहुल राठोड़ मारोती राठोड़ नवनाथ राठोड़ विकास राठोड़ आदी उपस्थीत होते

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत