प्रा.शाम जवळेकर यांना गणित विषयात ph.D प्राप्त

परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
स्वामी विवेकानंद बीसीए महाविद्यालय मंठा चे प्रभारी प्राचार्य  शाम दिनकरराव जवळेकर यांनी नुकतेच मॅथेमॅटिक्स या विषयामध्ये प्रोफेसर डॉक्टर शोएब अली सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली शोध प्रबंध सादर करून विद्यावाचस्पती(ph.D) हि पदवी प्राप्त केली आहे. 
अनाल्याझिंग द असिम्प्टोटिक प्रॉपर्टीज ऑफ झिरो सेट्स ऑफ मल्टी वरायटीज पोलिनोमिया अँड डियर प्रॅक्टिकल एप्लीकेशन. या प्रमुख विषयामध्ये शोध प्रबंध सादर केला. या साठी त्यांना गणित विभाग प्रमुख प्रा डॉ शोएब अली सय्यद व बहिस्त म्हणून प्रा डॉ निधी राईकुंदलिया यांनी सहकार्य केले.
   प्रा शाम जवळेकर यांनी मिळवलेल्या यशा बदल संस्थेचे सचिव  कपिल भैया आकात, उपाध्यक्ष  कुणाल दादा आकात,प्राचार्य डॉ भारत खंदारे,प्राचार्य डॉ माणिकराव थिटे,प्राचार्य डॉ सुधाकर जाधव,प्रा डॉ सदाशिव कमळकर,प्राचार्य डॉ मानव ठाकूर,प्राचार्य डॉ शिदे सर, प्रा डॉ भगवानसिग ढोभाल,श्री दत्ता भाऊ पाथ्रीकर,प्रा डॉ शरद कुलकर्णी,श्री अशोक मुळे, प्रभाकर सुरुग,प्रा डॉ बापू सरवदे आदी महाविद्यालयामधील सहकारी मित्र परिवाराच्या वतीने आनंद व्यक्त होत आहे तर सामाजिक,संस्कृतिक,शैक्षणिक शेत्राधील मान्यवरानी देखील अभिनंदन केले.

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

जालना तालुक्यातील आज्ञात व्यक्तीने पंचरंगी ध्वज पाडला, पालीसाचा फौज फाटा सह तहसीलदार दाखल, परिसरात तणाव पूर्ण वातावरण

विकी सुपारकरच्या मारेकऱ्यांना फाशीच्या शिक्षेची मागणी