सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

छत्रपती गणेश मंडळाच्या शिबीरात 35 जणांचे रक्तदान




परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
 जालना जिल्हात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने गणेश उत्सव काळात रक्तदान शिबिरे आयोजित करण्याचे आवाहन करण्यात आले होते त्याला प्रतिसाद देत परतूर शहरातील रेणुकानगर येथील छञपती गणेश मंडळाने सामाजिक बांधीलकी जपत रविवार 24 सप्टेंबर रोजी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते.गणेश मंडळाचे अध्यक्ष कार्तिक बोराडे यांच्या पुढाकारातुन आयोजित रक्तदान शिबीराला उदंड प्रतिसाद देत तब्बल 35 गणेश भक्तांनी रक्तदान केले.तत्पुर्वी शिबीराचे उदघाटन डाॅ.सोमनाथ रेपे,डाॅ.योगेश कदम,डाॅ.हरिप्रसाद ढेरे,नगरसेवक राजेश भुजबळ,बाबुराव हिवाळे यांच्या हस्ते पार पडले.
   यावेळी माजी सैनिक सोपान धुमाळ,डाॅ.स्वप्निल मंञी,विजय बोराडे,रामचंद्र धुमाळ,नामदेव काकडे,राजेश मस्के,सोमनाथ पांगरकर,दत्ता सुरूंग,राहुल कदम,राधेशाम तापडिया,आबासाहेब काकडे,गणेश कातारे, पुरुषोत्तम जेथलिया,अनिकेत कोंडावार,कृष्णा कातारे,बाळु काकडे,भागवत घडे,महेश नळगे,गणेश जगताप,साहिल सकलेचा,सुरज वैष्णव,रितेश शहाणे,दत्ता माळवदे,सिध्देश्वर बिल्हारे,कृष्णा धुमाळ जालना येथील जनकल्याण रक्तपेढीचे  डॉ,संदिप वाघमारे ,कृष्णा इंगळे, प्रविण दुर्गम,अभिजीत जोशी आदी उपस्थित होते. गणेशोत्सव काळात अनेक सामाजिक उपक्रम राबवणार असल्याचे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले.
   रक्तदानामध्ये शतकाच्या उंबरठ्यावर असणारे डाॅ.राजगोपाल तापडिया यांचा यावेळी छञपती गणेश मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत