सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

प्रांजल सुप्रीया योगेश जोशी चे यश

तळणी : प्रतिनिधी रवी पाटील 
   तळणी येथील केद्रीय प्राथमिक शाळेची विद्यार्थी कु प्रांजल सुप्रीया योगेश जोशी ने निबंध स्पर्धत मंठा तालुक्यातुन प्रथम पटकावला मराठवाडा अमृत महोत्सवाच्या निमीत्य घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धामध्ये तीने हे यश संपादन केले( प्राथमिक गट)
   तीच्या या यशामुळे परतूर मंठा मतदार संघाचे आमदार बबनराव लोणीकर यानी तीचे मंठा आभिनंदन करुन सत्कार केला यावेळी केद्र प्रमुख अशोक भावसार खंदारे सर अभय बायस धारतरकर सर शालेय शिक्षण समीतीचे अध्यक्ष्य संदीप पाटील गजानन देशमुख नितीन सरकटे दारासीग चव्हाण सरंपच गौतम सदावर्त सुधाकर सरकटे नानासाहेब खंदारे शरद पाटील भगवान देशमुख गोपाल सरकटे शरद सरकटे यावेळी उपस्थीत होते

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत