सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

तळणी येथील सकल मराठा समाज बांधवाचे साखळी उपोषणाचे रुपांतर आमरण उपोषणात

तिनिधी | तळणी( रवि पाटील)
   मंठा तालूक्यातील तळणी येथे आज सकल मराठा समाज बांधवाच्या वतीने साखळी उपोषणाला सुरवात करण्यात आली होती याच साखळी उपोषणाचे रुपांतर आज मंगळवार पासून आमरण उपोषणात करण्यात आले आहे नानासाहेब खंदारे याच्या नेतृत्वात हे आमरण उपोषण आज पासून सुरू करण्यात आले तळणी परीसरातील पंधरा ते विस गांवाचा सहभाग या उपोषणात राहणार आहे अंतरवाली सराटे येथे सुरू असलेल्या . मराठा आरक्षणाच्या या लढाई ला व मनोज जरांगे याना पाठबळ मिळावे या हेतुने सकल मराठा समाज या आंदोलनात सक्रीय झाला असल्याचे उपस्थित मराठा बांधवानी सांगीतले आहे तळणी परीसरातील तळणी वडगाव शिरपूर कोकंरबा देवठाणा उस्वद कानडी इंचा टाकळखोपा वाघाळा लिबंखेडा दुधा सासखेडा किर्ला हनवतखेडा व आणखी अन्य गावांचा सहभाग या साखळी उपोषणाला राहणार आहे सुरवातीला छञपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून या साखळी उपोषणाला सुरवात करण्यात आली आहे एक मराठा कोटी मराठाच्या जयघोषाने बस स्टँन्ड परीसर दुमदुमून गेला 
 या आमरण उपोषणा सदर्भात जिल्हाधिकार्याना निवेदन देण्यात आले आहे 

काल सोमवार रोजी मंठा तहसीलदार रुपा चिञक यानी भेट देऊन सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्य सोबत चर्चा कली व शातंता पूर्ण मार्गाने आंदोलन करण्याचे आव्हाहन केले 
    तळणी येथून जवळच उस्वद येथील शाळकरी मुंलांनी आरक्षण मिळेपर्यन्त शाळेत न जाण्याचा निर्णय घेतला आहे काल वर्ग तिसरा ते आठवी पर्यन्तच्या विद्यार्थ्याच्या ऑनलाईन राज्य परीक्षाना सुरवात होणार होती परंतू विद्याथ्र्यानी शाळेतच न जाण्याचा निर्णय घेतला तसा व्हीडीओ समाज माध्यमांवर काल झळकला आहे 
    मराठा समाजाला जोपर्यन्त आरक्षण मिळत नाही तोपर्यन्त गावामध्ये सर्वपक्षीय नेत्याला येण्यास बंदी घालण्यात आली आहे तसा ठराव ग्रामपंचातीने घेतला आहे सकल मराठा समाज हे आंदोलन शांततेच्या मार्गाने लढत आहे सरकारने मराठा समाजाच्या भावना समजुन घेऊन कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण समाजाला द्यावे अशी मागणी या वेळी करण्यात आली तसेच मराठा समाजातील तरुणांनी आत्महत्या सारखा मार्ग स्वीकारू नये आपल्या समाजाचा इतीहास हा लढण्याचा आहे आत्महत्या सारखा चुकीचा मार्ग निवडून आपल्या स्वंकीयाना त्यामुळे आधिकच ञास होतो अशा भावना यावेळी उपस्थीतानी व्यक्त .केल्या आज सुरू या आमरण उपोषणाला अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत