सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

मेन रोड वरील अतिक्रम स्वःता काढून घ्यावे -मुख्यधीकारी अभीषेक परदेशी

 परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
आज परतूर शहरात मेन रोडची नगर परिषद चे मुख्यधीकारी अभिषेक परदशी यांनी पाहानी केली यावेळी त्यांनी व्यापाऱ्या ना सुचना केल्या की जर कोणाचे अतिक्रमण असतील तर त्यांनी स्वःताहून काढून घ्यावे
   परतूर शहरात मेन रोड राजू मुंदडा यांच्या पानपट्टी पासून पुढील रस्ता राहीलेला असून या राहीलेल्या रस्त्याची पाहनी केली व व्यापाऱ्याना सुचना केल्या की येत्या 29 की डींसेबर रोजी शहरातील या राहीलेल्या रस्त्याच्या कामाचे उद्घघाटन आमदार बबनराव लोणीकर हे करणार असून हया रस्त्यावर ज्यांचे अतिक्रमण असतील,रोड वर काही पाट्या असतील,काही साहित्य असतील तर ते तातडीने स्वतःहून काढून घ्यावे नसता न.प.अतीक्रमण काढेल व रस्त्यावरील साहित्य जप्त करील असे शेवटी सुचना देताना न.प. मुख्यधीकारी अभिषेक परदेशी यांनी दिल्या 
   यावेळी त्याच्या सोबत अतिक्रमण निर्मूलन पथकातील कर्मचारी तसेच फायरमन अनील पारीख, स्वच्छता निरीक्षक रवी देशपांडे,सुरेश अर्सुल ,आदी होते

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत