बनावट कागदपञ तयार करून बिल घेतले ?वाघाळा ग्रामपंचायतचे जिल्हाधिकार्याना निवेदन


तळणी  प्रतिनिधी रवी पाटील 
  येथून जवळच असलेल्या मौजे वाघाळा येथील सन २०१८ -१९ मध्ये गौण खणिज लिलावा अतर्गत ग्रामपंचायतीना मिळणारा दहा टक्के लाभाच्या रकमेतून वाघाळा येथील पाणीपूरवठा योजनेसाठी दहा लाख एकावन हजार रुपयांचा निधी शासनाकडून प्राप्त झाला होता . परतू संबंधीत यञणेने बनावट कागदपत्राच्या आधारावर प्रत्यक्ष्य काम न करता यापैकी पाच लाख पच्चवीस हजार रुपये उचलून घेतले आहेत उर्वरीत रक्कम ही आज ही ग्रामपंचायतच्या खात्यावर जमा आहे सबंधीत यञणेने आधीचे काम न केल्याने आता ग्रामपंचायतला खात्यावर असलेल्या रकमेमधून हे काम करण्यास मोठी अडचण येत आहे नियमा प्रमाणे संबंधीत एजन्सी ला हे काम पूर्ण करुन देने बंधन कारक आहे ग्रामपंचातच्या वैतीरीक्त ही एजन्सी असल्याने ग्रामपंचायत ला या कामासाठी अनेक अडचणी येत आहेत संदरील एजन्सी राजकुमार जनार्धन बोराडे या नावाने असून याच एजन्सीने हे बील उचलून घेतले असून उचललेले बील त्या एजन्सी कडून वसुल करण्यासाठी जिल्हाधीकार्यानी योग्य ती कारवाई करावी व सबंधीत एजन्सीला काळ्या यादीत टाकण्याची मागणी सरंपच सुनील कांगणे , सिताराम ठाकरे , भिकाजी कांगने , उर्मिला बोडे , व सर्व ग्रामपंचायत सदस्यानी जिल्हाधीकारी यांना निवेदना द्वारे मागणी केली आहे

Popular posts from this blog

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले