जे जाळतय त्याला आधी जळावं लागतं - ह भ प समाधान महाराज शर्मा.

परतूर शहरात रंगली शिव कथा.
लाखो भाविकांनी कथामंडप ओसंडला.
परतूर प्रतीनीधी कैलाश चव्हाण
परतूर शहरात माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांच्या परिवाराच्या वतीने आयोजित शिव  कथा सांगताना समाधान महाराज शर्मा यांच्या ओजस्वी वाणीतून दुसऱ्या दिवशी
जे जाळतय त्याला आधी जळावा लागतं वातीला तेल जाळतं पण त्या तेलाला आधी जळावं लागतं त्यामुळे दुसऱ्याला जाळणं बंद करा असा उपदेश ह भ. प. समाधान महाराज शर्मा यांनी आज कथेच्या दुसऱ्या दिवशी उपस्थित भाविकांना दिला.