विषारी नाग धरल्या नंतर जेवढे सावध राहावे लागते तेवढेच अहंकाराच्या बाबतीत सुधा सावध राहावे -हभप वीजय महाराज वाघ बनकर

तळणी प्रतिनिधी रवी पाटील
 मनुष्याचा अहंकार हाच खरा शत्रू आहे ज्याने अहंकार सोडला त्याचा सुध्दा अंहकार असने सुध्दा सांसारीका साठी चागला नाही विषारी नाग धरल्या नंतर जेवढे सावध राहावे लागते तेवढेच अहंकाराच्या बाबतीत सुधा सावध राहावे लागते तसेच परमार्थीक मनुष्याला युध्दा सावध राहावे लागते मनुष्याला जर मोक्ष प्राप्त करायचा असेल तर त्याला अध्यात्मीक साधनेची जोड आवश्यक आहे . ती अध्यात्मक साधना कुठे प्राप्त करायची असेल तर किर्तन साधना महत्वाची आहे कारण किर्तन श्रवणातच मोक्ष आहे . ते प्रत्येकाने ऐकावे परमार्थ याच्या पेक्षा काय वेगळा असु शकतो . गरज आहे ते किर्तन नियमाने ऐकावे असा उपदेश ह भ प विजय महाराज वाघ बनकर यांनी कानडी येथे केला जगदगुरू तुकाराम महाराज यांच्या 
वाजतील तुरे येणे आनंदे गजरे 
जिकोनिया अहंकार पावटणी केले शिर॥१॥ 
काळा नाही वाव परीश्रमा कोठे ठाव 
तुका म्हणे आता सोपे वैकूठासी जाता ॥४॥ या अभंगावर सुंदर निरुपण केले 

जगदगुरू तूकाराम महारांजांना छञपती शिवाजी महाराजाना हिरे मोत्याचा नजराना पाठवला तरी सुध्दा महाराजांनी तो स्वीकारला नाही . धर्माने वागणार्या राजाने तो . खजिना दिला तरी सुध्दा तो महारांजानी स्वीकारला नाही. तसेच परमार्थीक मनुष्याने सुध्दा अधर्माने वागणार्या कडून धन स्वीकारू नाही हे जगदरू तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगीतले आहे घेऊ नये तैसे दान ज्याचे अभिलाशी धन ज्याना धंनाची जास्त अभिलाशा आहे अशाचे धन परमार्थीक मनुष्याने स्वीकारू नये धर्माने वागणार्या राज्याकडून आलेले धन सुध्दा तुकाराम महारांजानी स्वीकारले किती मोठा आदर्श तुमच्या आमच्या समोर महारांजानी घालून दिला आहे धर्मानी आलेले धर्माच्या राज्यानी दिलेले धन त्याचा त्याग तुकोबारायानी केला . राजानी दिलेल धन ज्या वेळेस नम्रपणे महारांजानी परत दिले त्या वेळेस जीजामाईच्या मनात त्या वेळेस काय भावना असतील याचा विचार करा की धर्माच्या राज्याने दिलेले धन जर आपण तुकोबानी का स्वीकारले नाही बर त्यावेळी जीजाबाईने राग व्यक्त करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. जीजाबाईचा अधिकार मोठा होता . जगाच्या मालकाने जीच्या पायातील काटा स्वःतच्या थुंकीने . काढला तर तीचा अधिकार सामान्य असेल का .
परमात्मा पांडुरंगावरची तुकोबांची भक्ती ही सामान्य नव्हती . त्यासाठी त्याकाळात तुकोबांना मोठा सघर्ष सहन करावा लागला रामेश्वर भट्टासारख्या ज्ञानी पंडीताने सुध्दा तुकोबाची निंदा केली पंरतू त्याच रामेश्वर भट्टाने अनेक रचना तयार केल्या . रामेश्वर भट्टाचा ही आधिकार सामान्य नव्हता .

मनुष्याने सांसारीक आयुष्यात समाधानी असले पाहीजे मनुष्य जन्म हा हा पुन्हा पुन्हा मिळणारा नाही परमात्माने दिलेला हा नरदेह भंगवंताच्या भक्तीत लीण करणे हेच प्रत्येक परमार्थीक मनुष्याचे कर्तव्य आहे तरच या नरदेहाचे सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही .मनुष्याला स्वःत चा उध्दार करण्यासाठी भक्ती मार्गाशिवाय पर्याय नाही अनेक सांधू संतांनी तो भक्ती मार्ग स्वीकारून स्वतःचा उध्दार केला आहे तोच मार्ग आपल्याला ज्ञानोबा तुकोबानी दिला आहे तो तुम्ही आम्ही स्वीकारून या जीवनाचा उध्दार करुन घ्यावा असे महाराजानी यावेळी प्रतित केले यावेळी पंचक्रोशीतील अनेक भावीकांची उपस्थीती लक्ष्यणी होती 
ह भ प विजय महाराज वाघ बनकर 
.

Popular posts from this blog

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश