सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

2024 चा भिमरत्न पुरस्कार योगी प्रधान यांना

परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
परतूर येथील रहिवाशी योगी प्रधान यांना यंदाचा 2024 चा भीमरत्न माजलगाव येथे एका कार्यक्रमातदेण्यात आला
   योगी  प्रधान हे समाज कार्यात नेहमीच अग्रेसर असून समाजातील शोषित पीडित घटकातील लोकांना नेहमीच मदत करत आसतात, वैद्यकीय, शैक्षणिक तसेच आरोग्यविषयक कॅम्प घेवून गोरगरिबांना मदत करीत राहतात नेहमीच परतूर येथिल समज घटकाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करीत असतात त्यामुळें योगी प्रधान यांचा खूप मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे 
  समित्र कॉलनी येथील त्यांच्या चाहत्यानी  योगी प्रधानला  नगर सेवक करण्याचा निर्धार केला आहे  त्यांच्या ह्याच समाज हिताच्या कार्याची दखल घेऊन भिमरत्न पुरस्कार 2024माजलगाव येथे माजलगाव मतदारसंघाचे चे आमदार प्रकाश सोळंके  यांच्या हस्ते देण्यात आला त्याप्रसांगी परभणी चे स विठ्ठल कांगने सर, टायगर ग्रूप चे प्रदेश अध्यक्ष उमेश  पोखरकर, व‌ इतर मान्यवर उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत