सुसाट वेगाने येणार्या स्वीप्ट डीझायरचा अपघात दोन जखमी


तळणी  प्रतिनिधी रवी पाटील 
मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवल्याने तळणी येथे स्वीप्ट डीझायरचा अपघात ( साय काळी ८ : ३०च्या दरम्यान  ) होऊन नायगाव ( ता मंठा ) येथील बाळू फुफाटे वाहन चालक व अन्य एक साथीदार जखमी झाला सविस्तर वृत्त असे की नायगाव येथील चार व्यक्ती दोन महीलेसह दवाखान्याच्या निमित्याने विदर्भातील मेहकर येथे गेले होते . तळणी बस स्टँन्ड परिसरात काही साहीत्य घेण्यासाठी वाहनचालकाने गाडी बाजूला उभी केली गाडी मध्ये बसलेल्या बाळू फुफाटे याने   दारूच्या नशेतच गाडीचा ताबा घेतल्यानंतर चौकातील डीव्हायड्रर टाकली गाडीत बसलेल्या महीलांनी ओरडण्यास सुरवात केल्याने त्याने कशी तरी गाडी बाजुला केल्यानंतर भर चौकातुन अनेकांना चकवत श्री संत नेमीनाथ महाराज मंदीराजवळील विद्यूत पूरवठा  करणार्या मेन लाईनच्या खांबांना धडकून खड्डात पडली गाडीतील दोन ऐअर बॅंग उघडल्याने जीवीत हानी झाली नाही विद्यूत खांबांला गाडी धडकल्याने आवाज होऊन विद्यूत पूरवठा खंडीत झाला . आवाज मोठा आल्याने श्री संत नेमीनाथ महाराज सस्थानचे ह भ प अर्जुन महाराज बादाड यानी ग्रामस्थानां फोन वरून कळवली ग्रामस्थाच्या मदतीने सर्वाना बाहेर काढल्यानंतर मंठा येथे उपचारासाठी पाठवले  

श्री संत नेमीनाथ महाराज सस्थान ते ग्रामपंचायत कार्यालयापर्यन्त गेल्या दोन तीन वर्षात पाच ते सहा अपघात झाले यात तीन जनाचा बळी नाहक गेला  चौकात गतीरोधक बसवण्यासाठी ग्रामपचायत सह ग्रामस्थानी निवेदन देऊन सुध्दा गतिरोधक बसवले नाही याच रोडवर कॉलेजला व मदीरात  जाणार्याची  विद्यार्थ्यासह नागं रीकाची सख्या सुध्दा मोठी आहे तरी याकडे दुर्लक्ष आहे ?

पोलीस उशीराच 
घटनेची माहीती काही ग्रामस्थांनी तळणी पोलीस चौकीला कळवल्यानंतर  संबधीताचा मोबाईल बंद झाला सर्व जखमीना गाडीत बसवल्यानंतर पोलीस आले बस स्टॅन्ड परीसरात उभे असलेल्या अनेक ग् नागरीकांना  प्रत्यक्ष्य हा थरार बघीतला

एम .एच बी व्ही२१ २४०३

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

सकल राजस्थानी समाज नवरात्र महोत्सवच्या अध्यक्ष पद्दी शरद भारुका तर सचिव: शुभम चित्तोडा यांची निवड