सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

आमदार बबनराव लोणीकर यांना कॅबिनेट मंत्रीपदासह जालना जिल्ह्याचे पालकत्व द्या -संजय भालेराव

जालना प्रतिनिधी समाधान खरात
 परतूर मंठा विधानसभा मतदारसंघात भाजपाचे मा मंत्री आ बबनरावजी लोणीकर भरघोस मतांनी पुन्हा पाचव्यांदा  निवडून आलेले आहेत, मराठवाड्यात भाजपाचे ज्येष्ठ नेते म्हणून मा लोणीकर यांच्याकडे पाहिले जाते लोणीकर यांनी त्यांच्या मंत्रीपदाच्या कार्य काळामध्ये वॉटर ग्रेड योजना अत्यंत अभ्यास व कर्तृत्वपणाने राबवलेली असून, याचा मोठ्या प्रमाणात मराठवाड्यात सह परतुर मंठा विधानसभा मतदार संघातील   जनतेला अनेक वस्त्यांमध्ये  200 गावाला आज शुद्ध पिण्याचे पाणी मिळत आहे, मतदारसंघातील मागासवर्गीयांच्या अनेक वस्त्यांमध्ये पिण्याचे पाणी ची सोय, सभामंडप,रस्ता नाली, स्मशानभूमी, यासह मागासवर्गीयांसाठी रमाई योजना अंतर्गत हजारो घरे उपलब्ध करून मा लोणीकर साहेबांनी दिलेले आहेत, आंबा ताप परतुर येथे मागासवर्गीय मुलींच्या 100 क्षमता असलेल्या 15 कोटी रुपयांच्या वस्तीग्रहाचे अद्यावत बांधकाम करण्यात आलेले आहे, तसेच मंठा जि जालना येथे सुद्धा 100 क्षमता असलेल्या मागासवर्गीयांच्या मुलींच्या वस्तीगृहाचे काम सुद्धा मा लोणीकर यांच्या कार्यकाळात झालेले आहे, मतदारसंघातील अनेक वस्ती वाड्या छोट्या छोट्या गावांमध्ये अंतर्गत रस्ते मुख्य रस्त्याला डांबरी करण्याने जोडलेले आहेत, परतूर मंठा विधानसभा मतदारसंघात  यांच्या मागील दहा वर्षाच्या कार्य काळा मध्ये प्रचंड विकासाची कामे करण्यात आलेली आहे,  मागासवर्ग समाजाच्या युवकांना रोजगाराच्या उंबरठ्यावर उभा करण्यात आलेले आहे, मतदार संघातील 18 पगड सर्व जाती धर्माला सोबत घेऊन विकासाची कामे करणारा सर्वसामान्य कार्यकर्ता बबनरावजी लोणीकर आहेत, परतूर मंठा विधानसभा मतदारसंघातील तमाम आंबेडकरी व भीमसैनिकांची लोणीकरांना राज्याच्या मंत्रिमंडळात  स्थान देऊन जालना जिल्ह्याचे पालकत्व देण्याची आग्रही  मागणी करीत आहोत असे प्रतिपादन भीम उद्योग अभियानचे संस्थापक अध्यक्ष मा संजय भालेराव यांनी केले आहे

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत