सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या परतूरात, जेथलिया करणार राष्ट्रवादीत प्रवेश


परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
 राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार शनिवारी परतूरच्या दौऱ्यावर येत आहेत. माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. 
  राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा.सुनिल तटकरे,मा. रुपालीताई चाकणकर,मा.ना. दत्तामामा भरणे, मा.ना.इंद्रनील नाईक,युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील नगर परिषद स्टेडियम परिसरात शनिवारी सकाळी १० वाजता अजित पवारांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादीचे मराठवाड्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी, आमदार उपस्थित राहणार आहेत. नगर परिषद स्टेडियमवर भव्य शामियाना उभारण्यात आला आहे. शहरातील मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया परतूर, मंठा आणि नेर, सेवली परिसरातील आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधणार आहेत.जास्तीत जास्त पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी या सभेला उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार अरविंद चव्हाण, सुरेशकुमार जेथलिया यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत