अलीना शेख वजीर या 8 वर्षाच्या चिमुकलीने ठेवला आयुष्यातील पहिला रोजा..



परतुर प्रतिनीधी कैलाश चव्हाण

कल्याण कोण शहरातील  गुत्तेदार शेख वजीर यांची मुलगी 8 वर्षीय शेख अलीना या चिमुकली मुलीने माहे रमजान या पवित्र महिन्यातील पहिला रोजा पूर्ण केला आहे.कडक उन्हाळयात जिवाची लाही लाही होत असताना,अशा अवघड परिस्थितीतही माहे रमजानमध्ये पहाटे पाच ते सायंकाळी सात वाजेपर्यंत अन्न,पाणी न घेता जवळपास अखंड चौदा तासांचा रोजा (उपवास) पूर्ण केला आहे.

इस्लाम धर्मात पाच तत्वांपैकी रोजा याला विशेष महत्त्व आहे, दिवसभरात थुंकीही न गिळता पवित्र असा रोजा मुस्लिम बांधव पुर्ण करतात,असा कडक रोजा (उपवास) शेख अलीना यांने पुर्ण केला असून पहिला रोजा सोडताना इफ्तारच्या वेळी (उपवास सोडताना) हार घालण्यात आला होता,एवढया लहान वयातच तिने रमजानचा पहिला उपवास केल्याने आजोबा शेख मुसा.चुलते शेख नजीर शेख नासिर शेख राजू व मामा सैय्यद तय्यब. सैय्यद ताहेर सैय्यद मोसिन.नाना सैय्यद महाम्दली यांच्या सर्व नातेवाईकांकडून सर्वत्र कौतुक केले जात आहे.

Comments

Popular posts from this blog

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत