योगेश डोणे हे पंचायत समितीच्या उमेदवारीसाठी ठरताहेत प्रबळ दावेदार...!
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर गावपातळीवर राजकीय घडामोडी वेगाने सुरू झाल्या आहेत. अनेक गावांमध्ये विविध पक्षांचे नेते, कार्यकर्ते आणि संभाव्य उमेदवार तयारीच्या मोडमध्ये दिसत आहेत. अशात योगेश गणेशराव डोणे यांनी वरफळ गणातून पंचायत समिती निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. योगेश डोणे हे नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी कायम अग्रेसर राहुन समस्यांचे निराकारण करणारे व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जातात. गेली अनेक वर्षे नागरीकांसाठी निष्ठेने काम केले असून, दिलेला वेळ, दाखविलेली निष्ठा आणि जनसंपर्क याच त्यांच्या उमेदवरीच्या प्रमुख ताकदी ठरतील, स्थानिकांचा विश्वास आहे. स्थानिक कार्यकर्त्यांचा कल आणि जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता योगेश गणेशराव डोणे यांच्या नावाला मोठा पाठिंबा मिळत आहे. असा योगेश डोणे यांनी युवा मल्हार सेनेच्या माध्यमातुन अनेक सामाजीक समस्या सोडवून अनेकांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच या भागातील रस्ते, पिण्याचे पाणी, शेतकरी सुविधा, सार्वजनिक बांधकामे अशा अनेक योजना प्रत्यक्षपणे राबविल्या...