आनंद इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज (क्रॉप सायन्स), परतूर येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा
परतूर येथील आनंद इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज (क्रॉप सायन्स) यांचे वार्षिक स्नेहसंमेलन आनंद, उत्साह व सांस्कृतिक वातावरणात मोठ्या उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांच्या सुप्त कला-गुणांना व्यासपीठ मिळवून देणारा हा कार्यक्रम उपस्थितांसाठी विशेष आकर्षण ठरला.
या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन नवनिर्वाचित नगराध्यक्ष मा. सौ.प्रियंका राक्षे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. सत्यशीला तौर या विराजमान होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून नवनिर्वाचित नगरसेविका शीला राऊत, कल्पना डहाळे व स्नेहा अग्रवाल संस्थेच्या कोषाध्यक्ष डॉ. मनीषा कदम यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली व विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर प्रेरणादायी संदेश दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे प्राचार्य नारायण सागुते यांनी केले. आपल्या मनोगतात त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सांस्कृतिक उपक्रमांचे असलेले महत्त्व अधोरेखित केले.
स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्य, गीत, समूह नृत्य व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाला उपस्थितांकडून भरभरून दाद मिळाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा सातोनकर यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम आनंदी व उत्साही वातावरणात पार पडला.
या वेळी पालक, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली असून त्यांच्या सहकार्यामुळे स्नेहसंमेलन यशस्वीरीत्या पार पडले.
Comments
Post a Comment