सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

सोनलनगर येथे Z TV Kutumbh तर्फे महिलांसाठी विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी समाधान खरात 
जालना शहरातील सोनलनगर येथील श्री संत गजानन महाराज संस्थान या परिसरात दिनाक २१ मे २०२६ गुरुवार रोजी महिलांसाठी मनोरंजन, माहिती आणि उत्साहाचा संगम ठरलेल्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन Z TV Kutumbh तर्फे करण्यात आले. हा कार्यक्रम जालना महानगर पालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती यांनी प्रभाग नऊ मधील महिलांसाठी आयोजित केला होता.या कार्यक्रमाचे सूत्र संचलन श्री अक्षय बोरुडे यांनी केले या कार्यक्रमाला परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमामध्ये झी टीव्हीवर प्रसारित होत असलेल्या लोकप्रिय मालिकांची माहिती उपस्थित महिलांना देण्यात आली. या मालिकांमधील भूमिका साकारत असलेल्या व्यक्तीवर प्रश्न विचारण्यात आले ज्या महिलांनी बरोबर उत्तर दिले त्यांना स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळाली त्या महिलांसोबत विविध स्पर्धा घेण्यात आली.
मालिकांमधील सामाजिक संदेश, कौटुंबिक मूल्ये आणि मनोरंजनाचा भाग याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी महिलांनीही मालिकांविषयी आपली मते व्यक्त करत संवाद साधला.
महिलांच्या मनोरंजनासाठी विविध खेळ, स्पर्धा व मनोरंजक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. खेळांमध्ये सहभागी झालेल्या महिलांनी उत्साहाने सहभाग नोंदवत कार्यक्रमात रंगत आणली. विजेत्या महिलांना आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
संपूर्ण कार्यक्रमात आनंदी व उत्साही वातावरण पाहायला मिळाले. महिलांनी अशा प्रकारचे कार्यक्रम समाजात एकोपा वाढविणारे व महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारे असल्याची भावना व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल श्री गजानन महाराज संस्थान चे अध्यक्ष व सर्व विश्वस्त यांनी परिश्रम घेतले यावेळी संस्थांच्या वतीने आयोजकांचे व झी टी व्ही यांचे आभार मानले. यावेळी सौ संध्याताई देठे यांचा सत्कार सौ दीपाताई तोंडे यांनी केला तर झी टी व्ही चे अँकर श्री अक्षय बोरुडे यांचा सत्कार श्री ॲड रवींद्र डुरे यांनी केला . उपस्थित महिलांकडून या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल कौतुक करण्यात आले.
कार्यक्रम झाल्यानंतर सर्व उपस्थित असलेल्या महिलाना व इतर नागरिकांना श्री गजानन महाराज संस्थान यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी झी टी व्ही मार्केटिंग टीमचे प्रमुख श्री सुंदर कदम व त्यांच्या सर्व टीमने खूप मेहनत घेतली.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत