न्यू वंडर इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये गुरु पौर्णिमेच्या कार्यक्रम संपन्न

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा  न्यू वंडर इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज परतुर मध्ये गुरुपौर्णिमा निमित्त "जीवनातील गुरुचे महत्व" या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धेमध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी भाग घेतला तसेच इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनींनी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा या मंत्रावर शास्त्रीय पद्धतीने नृत्य सादर करून गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त केली.  नृत्य दरम्यान इयत्ता दहावीची विद्यार्थिनी संस्कृती संतोष झरेकर हिने जीवनातील गुरुचे महत्व सांगून शाळेतील सर्व शिक्षक वृंदाचे आभार मानले. या कार्यक्रमा दरम्यान संस्थेचे अध्यक्ष  नारायण  सोळंके ,संस्थेच्या सचिव छाया बागल तसेच व्हॉइस प्रिन्सिपल पूजा मोरे, शिक्षकवृंद व  शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

अंगलगाव येथे ल॑पीचे 185.लसीकरण


सातोना/पांडुरंग शिंदे
परतूर तालुक्यातील अंगलगाव येथे दि.२२.रोजी.
ग्रामपंचायत अंगलगाव मार्फत लंपी लसीकरण शिबीर घेण्यात आले .काही दिवसापासुन महाराष्ट्रसह  परतूर तालुक्यात ही ह्या आजाराने शिरकाव केला आहे .मोठ्या प्रमाणावर गाय , बैल इत्यादी जनावरांना होणारा लंपी हा आजार धुमाकूळ घालतोय , लंपी आजारामुळे शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून  शासनाकडून लसीकरण होईपर्यंत या आजारात आपले दुभते जनावर दगवण्याचा धोका आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये आणि हा आजार अति प्रमाणात पसरू नये यासाठी सरपंच आप्पासाहेब खंदारे यांनी वेळीच लक्ष देऊन गावातील जनावरांना लसीकरण करण्यासाठी पुढाकार घेत ग्रामपंचायत मार्फत एकूण. 185.. जनावरांचे लसीकरण करून घेतले .हा आजार रोखण्यासाठी ग्रामपंचायतने पुढाकार घेऊन शिबीर आयोजित केले. होते...
पशुसंवर्धन व
दि:-22/09/2022 रोजी 
पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १ सातोना ता. परतूर जि जालना अंतर्गत मौजे
अगलगाव येथे .किटकनाशकांची फवारणी सह गोचीड व जंत निर्मुलन करण्यात आले, व विषाणूजन्य आजार लंम्पी स्कीन डिसी या आजारा विषयक उपयुक्त उपाययोजना व सविस्तर माहिती देऊन जनजागृती करण्यात आली या प्रसंगी श्जी . यु. वाघ(सहा.पशुधन विकास अधिकारी)  वानखेडे (वृणोपचारक)  दवंडे (परिचर),
नितीन दवंडे, निलेश दवंडे,  आकात,  शिंदे राहुल.खाजगी पशु (सेवादाते) पशुपालक-ग्रामस्थ 
यावेळी गावातील उपस्थित नागरिक.. कृष्णा खंदारे. अशोक खंदारे. सोसायटी चेअरमन भारतराव खंदारे. पत्रकार.पांडुरंग शिंदे. प्रमोद खंदारे. विश्वनाथ शिंदे.विठल खंदारे
 गावातील तरुणांचे व नागरिकांचे सहकार्य लाभले .


Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत