सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

जिल्हा पोलीस अधिक्षक यांची तळणी येथे भेट



तळणी : जालना जिल्हा पोलीस अधिक्षक विनायक देशमुख यानी आज तळणी येथे विविध तीन ठिकाणी भेट देऊन पाहणी केली सुरवातीला तळणी पोलीस चौकी येथे दप्तर तपासणी करून गावामधील नव्याने बांधलेल्या पोलीस चौकीची नव्याने बांधण्यात आलेल्या ईमारतीची पाहणी करून ऐतिहासीक निजामकालीन गढीची पाहणी केली या ऐतिहासीक वास्तू ची पाहणी करते वेळी त्यानी उपस्थिताकडून या गढी  विषयी चा ईतिहास जाणून घेतला निजामकालीन तोफ दरवाजे व दरवाज्या वरिल नक्षीकामाचे कौतूक केले तसेच . या पाहणी दरम्यान विविध जिल्हा च्या सीमा व त्याची माहीती सुध्दा यावेळी त्यांनी घेतली 

पोलिसांना सुचना 
या पाहणी दरम्यान दिंडी मार्गावरील वाहतूक व अवैध दारू विक्री करणाऱ्या वर कारवाई करण्याच्या सुचना पोलीसांना दिल्या जर परवानाधारक देशी दारू विक्रेता  ठोक विक्री करत असेल तर दुकान मालकास सहआरोपी करण्या च्या सुचना सुध्दा त्यानी पोलीसांना दिल्या 
यावेळी मंठा पोलीस निकम विलास निकम सह पोलीस निरीक्षक नित्तीन गटूवार तळणी बीट जमादार आर राठोड दिपक आढे गायके आदी पोलीस कर्मचारी उपस्थीत होते

अवैध दारू विक्रेत्यावर कारवाईचे आदेश 
चौकीची पाहणी : जिल्हा पोलिस अधिक्षकांची भेट

तळणी : तळणी चौकीतंर्गत अवैध दारु विक्रीच्या तक्रारीबाबत मंठा पोलीस निरक्षकांना जाब विचारत अवैध दारू विक्रेत्यावर कारवाईचे आदेश जिल्हा पोलीस अधिक्षक विनायक देशमूख यांनी तळणी चौकीला भेटीदरम्यान दिले . याप्रसंगी पोलीस चौकीच्या बांधकाम व निजामकालीन गढीला भेट देऊन पाहणी केली .

तळणी पोलीस चौकीतंर्गत अवैध दारू विक्रीच्या अनेक तक्रारीचा उल्लेख करत अवैध दारू विक्रेत्यासह देशीचे बॉक्स पूरविणाऱ्या देशी दारू दूकानदाराविरूद्ध कडक कारवाईचे आदेश मंठा पोलीस निरक्षक विलास निकम यांना दिले . 

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत