लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूरमध्ये विविध सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न ,नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून रुग्णांना फळे व ब्लँकेट वाटप, वृक्षारोपण तसेच अनाथ बालकांना अन्नदान

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा   दि. २२ जुलै : लोकनेते तथा महाराष्ट्राच्या राजकारणात जनसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे दिवंगत नेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.०० वाजता सरकारी दवाखाना, परतूर येथे करण्यात आली. यावेळी उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप  करण्यात आली. त्याचबरोबर रुग्णालय परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.  सकाळी ११.०० वाजता दृष्टी लॉयन्स, परतूर येथे रुग्णांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. गरजू व उपचाराधीन रुग्णांना आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले दुपारी १२.०० वाजता स्नेहांकुर अनाथ आश्रम येथे अनाथ व निराधार बालकांना अन्नदान करण्यात आले. बालकांसोबत प्रेमाने संवाद साधत त्यां...

माणसाने जीवन जगण्यात समतोल साधला पाहिजे ----सरपंच उद्धव पवार

 तळणी/ प्रतिनिधी : मानवाला जीवनामध्ये तीन अवस्थांमधून जावे लागते, बाल्यअवस्था,तरुणपण आणि वार्धक्य या तीनही अवस्थांमधून जाताना आपण जे कर्म करतो त्याचे फळ निश्चितच मिळते असे प्रतिपादन तळणी येथील सरपंच उद्धव पवार यांनी केले. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे, विभागीय कार्याध्यक्ष पंडितराव बोराडे, मंठा पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष अनिल बा. खंदारे यांच्या वाढदिवसानिमित्त तळणी येथे आयोजित कार्यक्रमात श्री पवार बोलत होते. वाढदिवसानिमित्त नेमिनाथ महाराज संस्थान मधील वारकरी संप्रदायातील विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन देण्यात आले तसेच मंठा येथेही ह भ प ज्ञानेश्वर महाराज  मदने माऊली यांच्या वारकरी शिक्षण संस्थेतील मुलांनाही  मिष्ठान्न वाटप करण्यात आले. तळणी येथे झालेल्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना सरपंच उद्धव पवार यांनी सांगितले की, माणसाने गर्व अहंकार लोभ इर्षा आदिचा त्याग करून आनंदी जीवन जगावे. दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पत्रकार समाजाचे प्रश्न सोडवतो असे सांगून त्यांनी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे विभागीय कार्याध्यक्ष पंडितराव बोराडे आणि मंठा कार्याध्यक्ष अनिल बा. खंदारे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि सामाजिक कार्यक्रम राबविल्याबद्दल आयोजकांचे कौतुकही केले. तळणी व मंठा येथे झालेल्या कार्यक्रमाला ह भ प ज्ञानेश्वर महाराज, ह भ प निवृत्ती महाराज कांगणे, ह भ प अर्जुन महाराज बादाड, ज्येष्ठ पत्रकार बाबा काका कुलकर्णी, पत्रकार संघाचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य संतोष दायमा, जिल्हा कार्यकारणी सदस्य रवी पाटील, तालुका अध्यक्ष बालाजी कुलकर्णी, पत्रकार संघाच्या महिला तालुका अध्यक्ष सौ मंजुषा काळे, माजी कार्याध्यक्ष तथा पत्रकार संघाचे सल्लागार अरुण राठोड, वसंतराव राऊत, गौतम सदावर्ते, डॉ आशिष तिवारी, आसाराम शेळके, केशव येऊल, प्रकाश भावसार, प्रवीण सरकटे,  नागेश भरदम यांची उपस्थिती होती

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत