लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूरमध्ये विविध सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न ,नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून रुग्णांना फळे व ब्लँकेट वाटप, वृक्षारोपण तसेच अनाथ बालकांना अन्नदान

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा   दि. २२ जुलै : लोकनेते तथा महाराष्ट्राच्या राजकारणात जनसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे दिवंगत नेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.०० वाजता सरकारी दवाखाना, परतूर येथे करण्यात आली. यावेळी उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप  करण्यात आली. त्याचबरोबर रुग्णालय परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.  सकाळी ११.०० वाजता दृष्टी लॉयन्स, परतूर येथे रुग्णांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. गरजू व उपचाराधीन रुग्णांना आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले दुपारी १२.०० वाजता स्नेहांकुर अनाथ आश्रम येथे अनाथ व निराधार बालकांना अन्नदान करण्यात आले. बालकांसोबत प्रेमाने संवाद साधत त्यां...

डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याचे मुख्य सूत्रधार अजूनही मोकाटच फिरत आहेत,त्यांना कधी पकडणार-जिल्हा उपाध्यक्ष कल्याण बागल

परतूर (प्रतीनीधी)
डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आठ वर्षे पूर्ण झाली आहे सीबीआयने त्यांच्या मारेकऱ्यांवर आरोपपत्र दाखल केले आहे मात्र,मुख्य सूत्रधार अजूनही मोकाटच फिरत आहेत. त्यांना कधी पकडणार,असा सवाल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे
 जालना जिल्हा उपाध्यक्ष कल्याण बागल यांनी केला.
 
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा परतुरच्या वतीने डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त डॉ.नरेंद्र दाभोलकर  हत्येच्या मुख्य सुत्रधारांना पकडण्यात यावे याकरिता उपविभागीय कार्यालय परतूर येथे निवेदन देण्यात आले होते याप्रसंगी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जालना जिल्हा उपाध्यक्ष कल्याण बागल बोलत होते याप्रसंगी 
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे परतूर तालुका अध्यक्ष एकनाथ कदम,जिल्हा प्रधान सचिव रमाकांत बरीदे,संभाजी तांगडे,दिलीप अण्णा मगर,सुनील खरात,अश्विन गुंजकर,लक्ष्मीकांत माने,देशमुख के.एन.,संतोष रनबावळे यांची उपस्थिती होती.

पुढे बोलतांना कल्याण बागल म्हटले की,विज्ञानवादी समाजसुधारक डॉ.दाभोलकर,कॉ.गोविंद पानसरे, प्रा.कलबुर्गी आणि गौरी लंकेश या चारही खुनांचे एकमेकांत गुंतलेले धागेदोरे तपास यंत्रणांनी उकलले आहेत.सीबीआयने दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात म्हटले, की खुनाचा तपास करताना या प्रकरणातील संशयित आरोपींचा कॉ.गोविंद पानसरे, प्रा. कलबुर्गी व गौरी लंकेश यांच्या खुनाशी असलेला संबंध रेकॉर्डवर आला आहे यामुळे डॉ.दाभोलकर यांच्या खुनामागील मुख्य सूत्रधार कोण आहेत हे सीबीआयने शोधून काढले पाहिजे,अन्यथा देशातील विवेकवादी विचारवंत,कार्यकर्ते,पत्रकार यांच्या अभिव्यक्तीला असलेला धोका संपणार नसल्याचे कल्याण बागल यांनी म्हटले आहे.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत