लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूरमध्ये विविध सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न ,नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून रुग्णांना फळे व ब्लँकेट वाटप, वृक्षारोपण तसेच अनाथ बालकांना अन्नदान

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा   दि. २२ जुलै : लोकनेते तथा महाराष्ट्राच्या राजकारणात जनसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे दिवंगत नेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.०० वाजता सरकारी दवाखाना, परतूर येथे करण्यात आली. यावेळी उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप  करण्यात आली. त्याचबरोबर रुग्णालय परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.  सकाळी ११.०० वाजता दृष्टी लॉयन्स, परतूर येथे रुग्णांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. गरजू व उपचाराधीन रुग्णांना आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले दुपारी १२.०० वाजता स्नेहांकुर अनाथ आश्रम येथे अनाथ व निराधार बालकांना अन्नदान करण्यात आले. बालकांसोबत प्रेमाने संवाद साधत त्यां...

मंठा येथील न्यु इंग्लिश स्कुल अँन्ड ज्युनिअर काँलेज मंठा येथे दिपावली निमित्त स्नेह संमेलन संपन्न

 

मंठा (सुभाष वायाळ)दि.11मागील एक ते दिड वर्षापासून कोरोना मुळे संपूर्ण शाळा कॉलेज बंद होते. परंतु शासन निर्णयया नुसार पहिली ते बारावी  चे वर्ग  सुरू करण्यात येणार आहेत.हा आनंद व्दिगुणित व्हावा व स्नेह वाढावा या उदेशाने स्नेह संमेलन आयोजित करण्यात आले असल्याचे डाँ.बि.बि.प्रधान सरांनी सांगितले.
                 कार्यक्रमाचे अध्यक्ष  म्हणून डाँ.बि.बि.प्रधान सर  होते तर प्रमुख पाहुणे  सिराज पठान,बाळासाहेब वांजोळकर,रवि प्रधान सर,कमळकर सर,गायकवाड सर,राहुल प्रधान सर,अरुन प्रधान सर, पप्पु वायाळ,खराबे   होते. मंठा नगरीत पालकांच्या तसेच शिक्षकांच्या सहकार्याने शाळा जोमात सुरू आहे कमी कालावधीत नावारूपाला आलेली संस्था एका मंठा या साररख्या भागात डॉ. बि.बि.प्रधान सर यांनी स्थापन करून शाळेला आधुनिक सुविधा उपलब्ध करुन दिल्यामुळे शैक्षणिक गुणवत्ता नावारूपाला आली आहे न्यु इंग्लिश स्कूल स्थापन करून शाळेला आधुनिक सुविधांमुळे तसेच शाळेचे मैदान असो शुद्ध पाणी असो या भागात स्थापन करून ग्रामीण विद्यार्थ्यांना नवीन व्यासपीठ मिळाले. शाळा सुरू झाल्यानंतर पहिल्यांदा विद्यार्थ्यांचा प्रवेश घेताना सत्कार केला जातो.तसेच व्यक्तीगत लक्ष दिले जाते.असे संस्थेचे   स्वपनिल प्रधान यांनी सांगितले  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरी शिक्षण मिळावे तसेच आधुनिक सुविधा प्राप्त करुन प्रत्येक विद्यार्थ्याला जगाशी पूर्ण माहिती अवगत झाली पाहिजे व प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक विषयात पारंगत होतील व एक नवी पिढी निर्माण होईल.आधुनिक सोयी मुळे विद्यार्थ्यांच्या संख्येत भरपूर वाढ होत आहे व पालकांचा वाढता पाठिंबा पाहता न्यु इंग्लिश स्कूल नावारुपाला नक्कीच येईल.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक राजेश मोरे सर , रंगारी मँडम,वाघमारे मँडम आदी कर्मचारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत