सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

अविनाश राठोड यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर


 मंठा -- (सुभाष वायाळ)दि. 1 मंठा तालुक्यातील नायगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच अविनाश राठोड यांना राजनंदनी बहुउद्देशीय संस्था जळगाव यांच्याकडून 2020-21 चा, सामाजिक, ग्रामविकास, आदिवासी कल्याण व बंजारा समाजामध्ये उल्लेखनीय काम केल्याबद्दल "समाज भूषण पुरस्काराने" सन्मानित करण्यात येणार आहे. हा पुरस्कार 5 डिसेंबर रोजी कलेक्टर ऑफिस जळगाव येथे मान्यवरांच्या हस्ते होणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
       अविनाश राठोड यांनी अशा विविध  पुरस्कारामुळे मला ऊर्जा प्राप्त होते आणि काम करण्यासाठी  उत्साह निर्माण होतो., त्याचप्रमाणे आगामी काळात आपण विविध सामाजिक व राजकीय कामे करणार असल्याचे सांगितले. पुढे त्यांनी हा पुरस्कार माझा नसून माझ्या गावकऱ्यांचा आहे.,शेवटी त्यांनी राजनंदनी बहुद्देशीय संस्था चे संचालक व सदस्यांचे आभार मानले.
        23 डिसेंबर रोजी सरपंच सेवा संघातर्फे  कोरोना  काळात  गावामध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल राज्यस्तरीय "कोरोना  युद्ध पुरस्काराने" सुद्धा राठोड यांचा सन्मान होणार आहे.
 या पुरस्कारामुळे राठोड यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत