लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूरमध्ये विविध सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न ,नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून रुग्णांना फळे व ब्लँकेट वाटप, वृक्षारोपण तसेच अनाथ बालकांना अन्नदान

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा   दि. २२ जुलै : लोकनेते तथा महाराष्ट्राच्या राजकारणात जनसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे दिवंगत नेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.०० वाजता सरकारी दवाखाना, परतूर येथे करण्यात आली. यावेळी उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप  करण्यात आली. त्याचबरोबर रुग्णालय परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.  सकाळी ११.०० वाजता दृष्टी लॉयन्स, परतूर येथे रुग्णांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. गरजू व उपचाराधीन रुग्णांना आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले दुपारी १२.०० वाजता स्नेहांकुर अनाथ आश्रम येथे अनाथ व निराधार बालकांना अन्नदान करण्यात आले. बालकांसोबत प्रेमाने संवाद साधत त्यां...

ओबीसीचे राजकीय आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ वाटूरात भव्य रास्ता ,ररस्ता रोकोपक्ष गट तट आणि संघटना बाजूला ठेवून ओबीसी समाज एकवटला,आरक्षण नाही तर निवडणूका नाहीची घोषणाबाजी



परतूर(हनूमंत दंवडे) सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे राज्यातील ओबीसी प्रवर्गातील जात समूहाचे राजकीय आरक्षण रद्द करण्यात झाल्याने ओबीसी समाजातुन तीव्र संताप व्यक्त केला जात असून ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले, सर्व गट तट पक्ष संघटना बाजुला ठेवून मोठ्या संख्येने ओबीसी बांधव एकवटल्या चे चित्र यावेळी दिसून आले, आरक्षण नाही तर निवडणूका नाही आशा घोषणाबाजी करत तब्बल दोन तास ठिय्या मांडण्यात आला.
याविषयी अधिक माहिती अशी की,मंगळवार दिनांक 11 रोजी वाटूर फाटा ता परतूर येथे नांदेड जालना महामार्गावर सदरील आंदोलन करण्यात आले,राज्यातील ओबीसी समाज राजकीय अरक्षणापासून वंचित झाला असून झालेल्या अनेक निवडणूका अरक्षणाविना घेण्यात आल्याने ओबीसी समाजात तीव्र संताप व्यक्त यावेळी दिसून आला, सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवलेले आरक्षण पुन्हा मिळावे याकरिता ओबीसी बांधव मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरून आपल्या मागण्या शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी गावागावातून हजारो ओबीसी बांधव उपस्थित झाले होते,ओबीसी समाजातील विविध घटकातील लोक आपल्या वेशभूषा परिधान करून या आंदोलनात सहभागी झाले होते,या आंदोलनात परतूर तालुक्यातील ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते,आंदोलनासाठी पोलिसांचा मोठ्या प्रमाणावर फौज फाटा तैनात करण्यात आला होता,रास्ता रोको आंदोलन यशस्वी करण्यासाठी विविध पक्ष संघटना सहभागी झाल्या होत्या,ओबीसी आरक्षण बचाव कृती समिती परतूर या बॅनर खाली हे आंदोलन पार पडले

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत