सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

ओबीसी राजकीय आरक्षणासाठी रास्ता रोको करणाऱ्या ओबीसी समाजाव गुन्हे दाखल,असे कितीही गुन्हे दाखल करा आमचे आंदोलन आरक्षण घेतल्या शिवाय थांबणार नाही,ओबीसी समाजाचा एल्गार


प्रतिनिधी/हनुमंत दवंडे
 वाटुर तालुका परतुर येथे आज सर्व ओबीसी बांधवांनी हिरावले गेलेले राजकीय आरक्षण तीव्र आंदोलन करत रास्ता रोको केला होता.
या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आरक्षण बचाव कृती समितीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहे .
यासंदर्भात ओबीसी समाजाच्या वतीने अशा प्रकारचे कितीही गुन्हे अंगावर घेण्यास तयार आहोत मात्र आमचा हक्क आम्ही सोडणार नाही जोपर्यंत आमचे राजकीय आरक्षण पूर्ववत लागू केले जात नाही तोपर्यंत आंदोलनाचा हा वनवा असाच पेटत राहील असा एल्गार ओबीसी बांधवांच्या वतीने करण्यात आला आहे
    खरेतर राज्यातील ओबीसी समाज हा राजकीय आरक्षणाविना अपंग झाला आहे अशा परिस्थितीमध्ये या समाजाला राजकीय आरक्षण देऊन पुन्हा एकदा राजकीय प्रवाहात अन्या ची गरज आहे मात्र सरकार आमच्या भावना समजून घ्यायला तयार नाही अशा परिस्थितीत लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करत असू तर कुठे बिघडले कोरोना चे कारण पुढे करून राज्यसरकारचा आमचे आंदोलन चिरडण्याचा डाव असल्याचे मत ओबीसी समाजातून व्यक्त केले जात आहे आज वाटुर तालुका परतुर येथे झालेल्या रास्ता रोको आंदोलनाची सरकारने धास्ती घेतली असून यापुढे महाराष्ट्र पेटेल यामुळे सरकारने हे आंदोलन दडपण्यासाठी गुन्हे दाखल केल्याचा आरोप ओबीसी बचाव समितीच्या वतीने करण्यात आला आहे
 आज पोलिस प्रशासनाने रामप्रसाद थोरात,प्रवीण सातोणकर,जगदीश पडूळकर,मदन  हजारे,गजानन केसरखाने, विक्रम माने, राजू माने,शेख कलीम,राधाकिशन माने,धर्मराज जाधव,शरद पालवे,कृष्णा आरगडे, अर्जुन नाईक,विदुर जईद,भगवान पाटोळे,अशोकराव आघाव, इंद्रजीत घनवट,सोनाजी गाडेकर, शिवाजी तरवटे, लहू आढे यांच्यासह 100 ते 150 समाज ओबीसी बांधवावर गुन्हा दाखल केला आहे

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत