सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

शालेय व्यवस्थापन समिती वायाळ पांगरी अध्यक्षपदी ज्ञानेश्वर बाबासाहेब वायाळ यांची निवड


             

मंठा(सुभाष वायाळ )दि.29 बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील भाग 4 कलम 21 नुसार प्रत्येक शाळेमध्ये शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात येते त्यानुसार मंठा तालुक्यातील वायाळ पांगरी येथे कोरोना चे सर्व नियम पाळून शालेय व्यवस्थापन समितीची पालक बैठक बोलवण्यात आली होती.त्यानुसार सर्वानुमते शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर बाबासाहेब वायाळ तर उपाध्यक्षपदी सो.आशामती प्रसाद वाकळे यांची निवड करण्यात आली. या समितीने सर्वांना असा विश्वास दिला की, शालेय गुणवत्ता वाढवने व मुलांचे भवितव्य उज्वल व्हावे. व शालेय व्यवस्थापनामध्ये पारदर्शकता यावी. शाळाबाह्य व अपंग मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणणे, पायाभूत व भौतिक सुविधा उपलब्ध करून देणे, शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेणे, शिक्षकांच्या समस्याचे निराकरण करणे व त्यांच्या कर्तव्याचा पाठपुरावा करणे,शालेय विकास आराखडा तयार करणे,  या सर्व गोष्टीवर भर देऊन निश्चितच शालेय गुणवत्ता वाढवू अशी हमी दिली. या निवडीबद्दल माजी पंचायत समिती सभापती गंगाधररावजी वायाळ, सुनीलराव वायाळ, युवराज वायाळ, दतराव वायाळ, प्रभाकर वायाळ, कैलास वायाळ, राहुल वायाळ, अंकुशराव वायाळ , ग्रामस्थ,पालक, यांनी अभिनंदन केले. तसेच यावेळी केंद्रप्रमुख बागल सर, मुख्याध्यापक आडे सर, सर्व शिक्षक गावकरी,पालक, उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत