सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

परतूर येथे ओबीसीची बैठक संपन्न..==========


परतूर प्रतिनिधी/हनुमंत दवंडे
परतुर: दिनांक 6 जानेवारी 2022रोजी कालिका माता मंदिर गाव भाग परतूर येथे ओबीसी समाजाची बैठक पार पडली. दिनांक 11 जानेवारी 2022 रोजी वाटुर तालुका परतुर येथे होणाऱ्या रास्ता रोको  आंदोलनासाठी या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली .ओबीसी आरक्षण हा केंद्र आणि राज्य सरकारचा डावआहे ,ओबीसींचे राजकीय आरक्षण का गरजेचे आहे? यावर प्रवीण भैया सातोनकर साहेब यांनी आपले विचार मांडले  तर भारत हा पूर्वीपासून खेड्यांचा देश असून या खेड्यात सुद्धा बारा बलुते दार आणि अठरा आलुते दार पद्धती होती असे राम प्रसाद थोरात सर यांनी सांगितले. ओ.बी.सी. आरक्षण सरकारने हिसकावून घेऊ नये यासाठी सर्व ओबीसी बांधवांनी एकत्रित येऊन एल्गार करावा असे आवाहन रासवे सर  यांनी केले. आता राजकीय आरक्षण काढले आता शैक्षणिक आरक्षण काढतील यावर इंद्रजित बापू घनवट  यांनी आपले मत मांडले तसेच पत्रकार हनुमंत दवंडे यांनी आपल्या ओबीसी गीत गाऊन वाटूर च्या मोर्चाला येण्यासाठी आव्हान केले. या बैठकीसाठी परतूर पंचायत समितीचे उपसभापती रामप्रसाद जी थोरात सर  जिल्हा परिषद सदस्य इंद्रजित बापू घनवट नगर परिषद परतूर चे नगरसेवक प्रवीण काका सातोनकर साहेब ,आणि पत्रकार मित्र हनुमंत दवंडे सर,  अर्जुन राठोड , दया काटे , मोईएन कुरेशी,गाव भाग परतूर येथील नागरिक  सोनू भोकरे, योगेश गायकवाड ,सोपान गोरे, योगेश गाते ,निकाळजे,  राहुल मुलमुले पत्रकार,  कैलास चव्हाण , सोपान गोरे , दता कोल्हे,  व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासवें सर यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत