सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

बाबुलतारा येथील कॉंग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते विष्णु जगताप यांचा समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश

         परतूर (हनूमंत दंवडे)   बाबुलतारा येथील कॉंग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते विष्णु जगताप  यांनी आपल्या  समर्थकांसह शिव सेनेत जाहिर प्रवेश केला  त्यांनी शिवसेनेचे उप ता प्रमुख  रामचन्द्र काळे यांच्या मार्गदर्शना खाली हा प्रवेश केला त्यांचा प्रवेश  जालना येथे मा मंत्री अर्जुन खोतकर यांच्या दर्शना या निवासस्थानी झाला 
              या वेळी  अर्जुनराव खोतकर यांच्या सह जिल्हा संघटक मोहन अग्रवाल ता प्रमुख अशोकराव अघाव ,किसान सेनेचे माउली राजबिंडे, संदीप पचारे आदि उपस्थित होते या प्रंसगि जगताप यांनी सांगितले कि  जी प निवडणूकीत रामचंद्र  काळे यांना  निवडूण आण्या साठी आपण  प्रयत्न करुण व तो सार्थ ठरवणार असल्याच प्रतीपादन केले   हीच खोतकर साहेबांना  वाढदिवसाची भेट देणार असल्याच त्यांनी शेवटी सांगितले

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत