परतूर येथील पारधी वाडा इंद्रा गिरी महादेव मंदिर येथील अतिक्रमण हटवण्यात यावे उपविभागीय अधिकारी परतूर यांना निवेदन सादर..


परतूर प्रतिनिधी/ हनुमंत दवंडे
इंद्रा गिरी महादेव मंदिर येथे कडब्याची पेंडी व कुपाटी टाकून अतिक्रमण करण्यात आले आहे. शेत गट नंबर 272 /2 मधील निजाम कालीन महादेव मंदिर असून सन 1981 पासून सदर मंदिर देवस्थानचे रामा मालू काळे हे अर्थक सेवक असून मंदिराची देखभाल व दुरुस्ती करतात व पूजाअर्चा करत आहेत. मंदिराच्या प्रवेश शंभर फूट जागा दक्षिणेस 20फूट जागा व उत्तरेस 20 फूट जागा अशी आहे सध्या सदर ठिकाणी विद्युत पुरवठा नाही तसेच सदर मंदिर परतूर शहरातील पुरातन मंदिर असून अनेक वर्षी श्रावण महिन्यात प्रत्येक सणाला लोकांची जास्त प्रमाणात गर्दी होत असे सदर ठिकाणी इंगळा गिरी महादेव मंदिराचे समोर काही व्यक्तीनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे सदरील अतिक्रमण त्वरित काढण्यात यावे जेणेकरून सदर मंदिरासमोर दरवर्षी होणारी यात्रा करणे सुलभ होईल अशा आशयाचे निवेदन उपविभागीय अधिकारी कार्यालय परतूर यांना रामा मालू काळे यांनी दिले आहे.

Popular posts from this blog

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात