सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती परतूर कार्यकारणीची निवड जाहीर


परतूर /प्रतिनिधी हनुमंत दवंडे 

सार्वजनिक शिवजन्मोत्सवानिमित्त नियोजन बैठक शासकीय विश्रामगृह परतूर येथे आयोजित करण्यात आली या प्रसंगी पंचक्रोशीतील सर्व सामाजिक संघटना ,राजकीय पक्ष   पदाधिकारी उपस्थित होते , सर्वानुमते  कृष्णा सोळंके यांची अध्यक्ष तर सचिव  विष्णू मचाले , कार्याध्यक्ष  विक्रम धुमाळ , उपाध्यक्ष  नामदेव तौर , सहसचिव  लक्ष्मण बिलहारे , उपाध्यक्ष विष्णू काळे , कोषाध्यक्ष शाम शिंदे , यांची निवड करण्यात आली ,
या प्रसंगी शिवजन्मोत्सवाचे नियोजन करण्यात आले , शोभायात्रा अर्थात मिरवणूक सकाळी काढण्यात येणार आहे त्यात लहानमुले ,महिला सामील होणार आहेत , लेझीम पथक , देखावे , व शिवकालीन कला सादर करण्यात येणार आहेत , सर्व परतूर आणि परिसरातील शिवप्रेमींनी या शिवजन्मोत्सवात सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले प्रसंगी मार्गदर्शक रमेश सोळंके , महेश नळगे , संपत टकले ,विनायक भिसे , विष्णू शिंदे , सचिन खरात , पांडुरंग नवल,दत्ता सुरुंग , गजानन चवडे, दिपक कदम , सिद्धेश्वर लहाने  , डी एन केवारे व सर्व आजी माजी नगरसेवक , सर्व राजकीय पक्ष पदाधिकारी , सर्व सामाजिक संघटना उपस्थित होते

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत