मंठा पोलीस ठाणे येथे शिवजयंती निमित्त शांतता समिती बैठक संपन्न शिवजयंती शांततेत साजरी करा -पो.नि.संजय देशमुख


मंठा(सुभाष वायाळ )दि.१७ मंठा पोलीस ठाणे येथे शिवजयंती निमित्त शांतता समिती बैठकीचे आयोजन दि.१७ गुरुवार रोजी करण्यात आले होते.यावेळी पोलिस निरीक्षक संजय देशमुख पत्रकार संरक्षण समितीचे तालुकाध्यक्ष रंजीत बोराडे , पोहेका.शंकर राजाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आयोजित बैठकीत पो.नि.देशमुख यांनी सांगितले की, शिवजयंती शांततेत व शासन परिपत्रकाच्या नियमानुसार तसेच कोरोनाच्या नियमाचे काटेकोर पालन करून साजरी करावी असे आव्हान केले. याप्रसंगी डिगांबर बोराडे, शिवजयंती सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष संदीप बोराडे , सचिन चव्हाळ , महेश बोराडे ,शुभम बोराडे , विजय बोराडे , विकास बोराडे , किरण सूर्यवंशी , कृष्णा खरात , शिवराज बोराडे , दत्ता घुगे यांच्यासह पत्रकार सुभाष वायाळ , अशफाक शेख , बाळासाहेब खराबे यांची उपस्थिती होती.सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतिने आयोजित कार्यक्रमांची रूपरेषा सांगण्यात आली.

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

जालना तालुक्यातील आज्ञात व्यक्तीने पंचरंगी ध्वज पाडला, पालीसाचा फौज फाटा सह तहसीलदार दाखल, परिसरात तणाव पूर्ण वातावरण

विकी सुपारकरच्या मारेकऱ्यांना फाशीच्या शिक्षेची मागणी