लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूरमध्ये विविध सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न ,नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून रुग्णांना फळे व ब्लँकेट वाटप, वृक्षारोपण तसेच अनाथ बालकांना अन्नदान

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा   दि. २२ जुलै : लोकनेते तथा महाराष्ट्राच्या राजकारणात जनसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे दिवंगत नेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.०० वाजता सरकारी दवाखाना, परतूर येथे करण्यात आली. यावेळी उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप  करण्यात आली. त्याचबरोबर रुग्णालय परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.  सकाळी ११.०० वाजता दृष्टी लॉयन्स, परतूर येथे रुग्णांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. गरजू व उपचाराधीन रुग्णांना आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले दुपारी १२.०० वाजता स्नेहांकुर अनाथ आश्रम येथे अनाथ व निराधार बालकांना अन्नदान करण्यात आले. बालकांसोबत प्रेमाने संवाद साधत त्यां...

माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून व चि.प्रशिक गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त गोरगरीब अनाथ मुलांना फळे वाटप करण्यात आली ...


परतूर प्रतिनिधी/हनुमंत दवंडे
सन ऑफ आंबेडकर परतूर ग्रुपचे सनी गायकवाड यांचे चिरंजीव प्रशिक गायकवाड यांच्या वाढदिवसाचा आगाऊ खर्च  टाळून रेल्वे स्टेशन परिसर, शासकीय रुग्णालय परतुर ,   परिसरातील  गोरगरीब अनाथ मुलांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त अल्पोहर  चिवडा ,बिस्कीट, केळी, चिकू ही फळे वाटप करण्यात आली. या वाढदिवसानिमित्त समाजाला आगळा वेगळा संदेश ही त्यांनी दिला आहे. तसेच माता रमाई जयंती उत्साहात साजरी करून हा कार्यक्रम घेण्यात आला. तसेच  सामाजिक, सांस्कृतिक शैक्षणिक कामात अग्रेसर पद्धतीने परतूर शहरात सनी गायकवाड यांनी सन ऑफ आंबेडकर ग्रुपच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी कामे केली आहेत. आणि त्याच माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत आपल्या मुलाचा वाढदिवसाचा अवाढव्य खर्च न करता साध्या पद्धतीने चिरंजीव चि.प्रशिक गायकवाड यांचा वाढदिवस साजरी करण्यात आला.या कार्यक्रमाला उपस्थित म्हणून नितीन साळवे ,शुभम  वाहुळ, तसेच गायकवाड परिवारातील सर्व सदस्य ,व सन ऑफ आंबेडकर ग्रुप परतूर ची सर्व टीम चे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत