सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

शिवरायांचा पुतळा काढला तर कलेक्टरला शिवभक्त कदापि माफ करणार नाही - सिध्देश्वर काकडे



सेवली(सुभाष वायाळ )सेवली येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा मोठ्या थाटात शिवभक्तांनी बसवला आहे. हा पुतळा काढण्याचा जालना जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी आदेश दिला आहे. या आदेशाला मराठा संघटनांसह शिव भक्तांनी विरोध दर्शविला आसल्याने सद्यस्थिती मध्ये हा पुतळा सेवली या ठिकाणी आहे. जालना जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड म्हणजे हिंदुच आहेत. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा अवहेलना करता कामा नये. नाही तर जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांना शिवभक्त कदापीही माफ करणार नसल्याचे शेतकरी क्रांती सेना संस्थापक अध्यक्ष सिध्देश्वर काकडे यांनी म्हंटले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कुठंही बसला तर काय बिघडलं? सरकारने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अजिबात विरोध करता कामा नये. छत्रपती शिवाजी महाराज हे या भुमीचे राजे आहेत. याचं भान जालना जिल्हा प्रशासनाने जपलं पाहिजे. जर सेवली येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवला तर जालना जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांची खुर्चीच आपण रस्त्यावर आणुन टाकल्या शिवाय रहाणार नाही. आसा खणखणीत इशारा शेतकरी क्रांती सेना संस्थापक अध्यक्ष सिध्देश्वर काकडे यांनी दिला आहे.

Comments