न्यू वंडर इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये गुरु पौर्णिमेच्या कार्यक्रम संपन्न

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा  न्यू वंडर इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज परतुर मध्ये गुरुपौर्णिमा निमित्त "जीवनातील गुरुचे महत्व" या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धेमध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी भाग घेतला तसेच इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनींनी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा या मंत्रावर शास्त्रीय पद्धतीने नृत्य सादर करून गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त केली.  नृत्य दरम्यान इयत्ता दहावीची विद्यार्थिनी संस्कृती संतोष झरेकर हिने जीवनातील गुरुचे महत्व सांगून शाळेतील सर्व शिक्षक वृंदाचे आभार मानले. या कार्यक्रमा दरम्यान संस्थेचे अध्यक्ष  नारायण  सोळंके ,संस्थेच्या सचिव छाया बागल तसेच व्हॉइस प्रिन्सिपल पूजा मोरे, शिक्षकवृंद व  शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

विलास आकात यांच्याकडून सुमेध घनघावला उपचारासाठी आर्थिक मदत

 
  परतूर – प्रतिनिधी हनुमंत दवंडे
  येथील सुमेध राजु घनघाव रा. परतूर (वय १९) याला आठ महिन्यापूर्वी अपघातात डोक्याला मार लागल्याने जखमी झाला होता. त्याचा उपचारासाठी सातोना     येथील भाजपाचे विलास आकात यांनी दहा हजार रुपये आर्थिक मदत केली आहे.    
  सुमेध घनघाव हा नातेवाईक सोबत परतुर ते आष्टी रोडवर एचपी पेट्रोलपंपच्या समोर पुलाजवळ गाडी खड्ड्यात जावुन गाडीवरील ताबा सुटल्याने दि. २६ जून २०२१ रोजी अपघात झाला होता. या अपघातात डोक्याला गंभीर मार लागल्याने सुमेध हा बेशुद्ध झाला. दवाखान्याला मोठा खर्च लागल्याने घरची शेती, ट्रॅक्टर, प्लॉट विकून, नातेवाइकाकडून पैसे आणून दवाखाना खर्च केला. कुटुंबाची आर्थिक परिस्थिति बिकट असल्याने समाजातून आर्थिक मिळाली. सध्या त्याच्यावर औषध उपचार चालु आहे. जवळ असलेली आर्थिक पुंजी संपली असल्याने कुटुंबासमोर आर्थिक अडचणीचा प्रश्न उभा राहिला आहे. सध्या औषध उपचाराचा खर्च मोठा असल्याने आर्थिक मदत करण्याची गरज आहे.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत