लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूरमध्ये विविध सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न ,नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून रुग्णांना फळे व ब्लँकेट वाटप, वृक्षारोपण तसेच अनाथ बालकांना अन्नदान

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा   दि. २२ जुलै : लोकनेते तथा महाराष्ट्राच्या राजकारणात जनसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे दिवंगत नेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.०० वाजता सरकारी दवाखाना, परतूर येथे करण्यात आली. यावेळी उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप  करण्यात आली. त्याचबरोबर रुग्णालय परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.  सकाळी ११.०० वाजता दृष्टी लॉयन्स, परतूर येथे रुग्णांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. गरजू व उपचाराधीन रुग्णांना आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले दुपारी १२.०० वाजता स्नेहांकुर अनाथ आश्रम येथे अनाथ व निराधार बालकांना अन्नदान करण्यात आले. बालकांसोबत प्रेमाने संवाद साधत त्यां...

ऑस्ट्रेलियातुन सेवा पूर्ण करून आलेल्या अभियंत्यांचा परिवारा कडून सत्कार


परतूर/प्रतिनिधी हनुमंत दवंडे 
ऑस्ट्रेलिया येथे सहा वर्ष संगणक अभियंता म्हणून काम करत परतूर येथील सुपुत्र भारतात परतल्यावर त्यांचा कुटूंबाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
    परतूर येथील भगीरथ भारतराव केशरखाने ये ऑस्ट्रेलिया येथील सिडनी शहरात इन्फोसिस कंपनीत संगणक अभियंता म्हणून मागील सहावर्ष पासून काम करत होते. दि 19 रोजी सहा वर्षे पूर्ण करून सपत्नीक ते भारतात परतले या बद्दल बरीदे परिवाराच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. भगीरथ यांनी अंबाजोगाई येथून आपले अभियंता चे शिक्षण पूर्ण केले आहे. परतूर येथील बरीदे परिवाराचे ते भाचे आहेत. परतूर येथे पोहचल्यानंतर गटविकास अधिकारी नारायण बरीदे व पत्नी प्रभावती बरीदे यांनी त्यांचा सत्कार केला या वेळी सहाशिक्षक रमेश बरीदे, सोनुभाऊ बरीदे,पांडुरंग कानपुडे,बाळू धारूकर, लक्ष्मीकांत माने,नागेश केशरखाने , श्रीमती शोभा बरीदे,सकाळ चे तालुका बातमीदार योगेश बरीदे आदी उपस्थित होते.

..

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत