सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सरफराज कायमखानी यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश

परतूर  प्रतिनिधी हनुमंत दवंडे 
परतूर शहरातील क्रीडा क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण योगदान सरफराज कायमखानी यांचे असून त्यांनी आता राजकीय आखाड्यात स्वतःला सिद्ध करण्यासाठी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर व युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला आहे
गेल्या 35 वर्षापासून ते क्रीडा क्षेत्रामध्ये सदैव कार्यरत असून कुठलीही क्रीडा स्पर्धा सर्फराज कायमखानी यांच्या विना पार पडत नाही तालुक्यासह मतदारसंघात व शहरात त्यांचा मोठा युवा वर्ग चाहता असून निश्चितच त्यांच्या लोकप्रियतेचा परतूर शहरामध्ये भारतीय जनता पार्टीला उपयोग होणार असून लोकप्रिय आमदार बबनराव लोणीकर यांनी त्यांचा सत्कार करून त्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेशित केले आहेत
   यावेळी सर्फराज कायमखानी यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सामाजिक सेवेसाठी भारतीय जनता पार्टी व माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर युवा नेते राहुल भैया लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण शहरात काम करणार असून निश्चितच पक्षासाठी आपण तन-मन-धनाने काम करणार असल्याचे यावेळी सर्फराज कायमखानी यांनी सांगितले त्यांच्या या प्रवेशाबद्दल तालुकाध्यक्ष रमेश भापकर भगवानराव मोरे दया काटे श्रीरंगराव जईद मनोहर पेडगावकर प्रकाश दीक्षित डॉक्टर कोटेच शहराध्यक्ष गणेश पवार नगरसेवक संदीप बाहेकर सुधाकर सातोंनकर, प्रकाश चव्हाण कृष्णा आरगडे ओम मोर बालाजी सांगोळे राजेंद्र मुंदडा सोनू अग्रवाल संतोष हिवाळे प्रमोद राठोड मनोज माटोले, सुबोध चव्हाण किशोर कद्रे मुज्जू कायमखानी मलिक कुरेशी इजू कुरेशी मुन्ना चितोडा अमोल अग्रवाल अमर बगडिया जितू मोर सिद्धेश्वर लहाने अमोल हरजुळे प्रभाकर वाघमारे गणेश शिंदे नरेश कांबळे यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत