मंठा शहरात शालांत परीक्षात कॉप्याचा महापूर मंठा प्रतिनिधी सुभाष वायाळ 
       महाराष्ट्र राज्यामध्ये एस.एस.सी. परीक्षेला सुरुवात होऊन मराठीच्या पहिल्या पेपरला मंठा शहरा सारखे काही अपवाद केंद्र वगळता शांततेत सुरुवात झाली. मंठा शहरातील पहिल्या मराठी पेपरच्या कॉपी प्रकरणाची दखल विविध वृत्तवाहिन्या व वृत्तपत्रांनी घेतलेली आहे.तरीसुद्धा परीक्षा केंद्रावर काहीच फरक पडल्याचे जाणवले नाही. शेवटच्या पेपरला सुद्धा कॉप्याचा महापूर आल्याचे दिसून आले. पहिल्या पेपरला कॉप्पयाचा सुळसुळाट तर शेवटच्या पेपर पर्यंत कॉप्याचा महापूर बाकीच्या पेपरची काय अवस्था असेल हे सांगायची आवश्यकता नाही. संबंधित विभागाने झोपेचे सोंग घेऊन परीक्षा नावाचा विद्यार्थ्यांशी खेळ खेळवला आहे.परीक्षा नावाच्या या खेळामध्ये असे घडू नाही पण घडलेच तर गुणवंत विद्यार्थी मागे राहून कॉपी बहाद्दराने प्रथम क्रमांक पटकावू नये.असे घडले तर हुशार,गुणवंत विद्यार्थ्याच्या मानसिकतेवर परिणाम होऊन महाराष्ट्रातच काय तर संपूर्ण भारत देशामध्ये कमी गुण पडल्यामुळे ज्या घटना घडतात अशा घटना घडल्या तर याची सर्वस्वी जबाबदारी स्वीकारणार कोण ? अशा या प्रकरणामुळे गुणवंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, नुकसान होऊन मानसिकतेवर विपरित परिणाम झाला तर याला जबाबदार कोण ? यावरून परीक्षा केंद्राची मुजोरी कायम लक्षात येत आहे. यात शिक्षण क्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱ्याचा किंवा राजकीय पुढाऱ्याचा वरदहस्त तर नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे ?तसेच परीक्षा केंद्राला कॉपी पुरवण्याचा परवाना किंवा ओपन टेक्स्टबुक ची परवानगी तर नाही ना असे शिक्षण विभागाने जाहीर करावे.असे जोरदार चर्चेला उधाण आले आहे.
             तरी सदरील प्रकरणाची दखल एस.एस.सी. बोर्ड परीक्षा नियामक मंडळाने व शिक्षण मंत्री महोदयांनी घ्यावी.नस्ता हुशार,गुणवंत विद्यार्थी यांच्या शैक्षणिक नुकसानीस संबंधित विभाग जबाबदार राहतील.तरी वरिष्ठांनी सदरील प्रकरणाची वेळीच दखल घेऊन विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक,मानसिक नुकसान टाळून संबंधितांवर योग्य कार्यवाही करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Popular posts from this blog

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले