परतूर नगरपालिकेच्या वाढीव घरपट्टी वरून भारतीय जनता पार्टी आक्रमक,कार्यालयीन वेळेत अधिकारी गैरहजर असल्यामुळे उपविभागीय अधिकारी कार्यालयातच मांडला ठिय्या,शहरातील अवास्तव घरपट्टी विरोधात माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या नेतृत्वात करणार आंदोलन,घरपट्टी वाढीस प्रशासना सह तत्कालीन नगराध्यक्ष जबाबदार*==

प्रतिनिधी/हनुमंत दवंडे
परतूर नगरपालिकेचा वास्तव घरपट्टी वाढी च्या मुद्द्यावरन भारतीय जनता पार्टी आक्रमक झाली असून अवाच्या सवा घरपट्टी वाढ झाल्याने शहरात नागरिकांनी घरी बांधावीत का नाही असा सवाल उपस्थित करीत उपविभागीय अधिकारी,नप मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले
संबंधित घरपट्टी वाढीस तत्कालीन नगराध्यक्ष व प्रशासन जबाबदार असल्याचा ठपका ठेवत भारतीय जनता पार्टी प्रणित नगर विकास आघाडी नगरसेवकांनी सदरील घरपट्टी वाढीच्या प्रस्तावाला माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या माध्यमातून स्थगिती मिळवली होती मात्र स्थगिती नंतर संशयास्पद एजन्सीला सर्वेक्षणाचे काम देण्यात आले या बाबतीत भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी वेळोवेळी पुढाकार घेतला मात्र नगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांनी या गोष्टीला फारसे महत्त्व न दिल्यामुळे आज ही वेळ आली आहे खरेतर घरपट्टी ची वाढ करताना 17 टक्के वाढ अपेक्षित होती मात्र प्रत्यक्षात ही वाढ पाच पटीने अधिक असल्यामुळे शहरातील नागरिकांना घरपट्टी मुळे डोळे पांढरे करण्याची वेळ आली आहे अशाप्रकारची संतप्त प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे
दरम्यान उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये निवेदनाची प्रत देण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांना उपविभागीय अधिकारी यांच्यासह नायब तहसीलदार अथवा कुठलाही सक्षम अधिकारी कार्यालयात नसल्याने भाजपा कार्यकर्ते आक्रमक झाले व त्यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या दालनात ठिय्या मांडला कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहून येथील कर्मचाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधला त्यावेळी आपण उच्च न्यायालयात असल्याचे उपविभागीय अधिकारी यांनी सांगितल्यानंतर कार्यकर्त्यांनी निवेदन देऊन मागणी मान्य करण्यात यावी नसता माजी मंत्री बबनराव लोणीकर व युवमोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांच्या नेतृत्वाखाली असल्याचे यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे
यावेळी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते भगवानराव मोरे दया काटे ओमप्रकाश मोर श्रीरंगराव जईद दिनेश शेठ होलानी नगरसेवक संदीप बाहेकर नगरसेवक प्रकाश चव्हाण नगरसेवक कृष्णा आरगडे राजेंद्र मुंदडा जगन्नाथ सोनखेडकर, शिवाजी बल्लमखाणे बळीराम हिवाळे प्रमोद राठोड मुज्जू कायमखानी मलिक कुरेशी नंदकिशोर मुंदडा आनंद कोटेचा जगदीश झंवर ओमप्रकाश राठी श्यामसुंदर चितोडा नरेश कांबळे राजेश म्हस्के अमर बगडीया संतोष काळे अमोल हरजुळे, भास्कर काळे दीपक कुरे विष्णू मचाले लालचंद मालपाणी सौरभ बागडीया यांच्यासह शेकडो कार्यकर्यांची उपस्थिती होती

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत