सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

मोहन अग्रवाल यांच्या प्रयत्नांमुळे परतूर शहरातील अतंर्गत सिमेंट रस्ते

 परतूर/प्रतिनिधी हनुमंत दंवडे
 शिवसेनेचे जिल्हा संघटक मोहन अग्रवाल यांच्या प्रयत्नाने परतूर शहरतील प्रभाग क्र. ०८ मध्ये राहुल सातोनकर यांचे दुकान ते स्व. बाबुराव सातोनकर व्यायाम शाळे पर्यतच्या सिमेंट काँक्रीट रोडचे काम चालू असून
    सदरील कामासाठी मोहन अग्रवाल यांनी नगर विकास मंञी एकनाथ शिंदे यांच्या विशेष निधीतून मंजूर करण्यात आला आहे.सदरील कामासाठी माजी नगरसेवक मोहन अग्रवाल व शोभाताई लड्डा यांनी खूप शर्यतीचे प्रयत्न करून निधी उपल्ब्ध केला आहे. अग्रवाल यांच्यामुळे परतूर शहरातील अंतर्गत सिमेंट रस्ते चकाचक होत आहेत. प्रत्येक्षात सिमेंट रस्त्याचे काम सुरु झाल्यावर येथील नागरिकांनी अग्रवाल व सौ.लड्डा यांचे आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत