सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

शिवसेना वाहनचालक मालक संघटनेच्या परतूर तालुका प्रमुख रामजी सोळंके यांची नियुक्ती

परतूर  प्रतिनिधी हनुमंत दंवडे
शिवसेना वाहन चालक मालक संघटनेच्या परतूर तालुका प्रमुख पदी रामजी बापूराव सोळंके यांची नियुक्ती पत्राद्वारे दि ४ जून २०२२ रोजी तालुकाप्रमुख अशोक आघाव यांनी केली आहे. नियुक्तीचे पत्र माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, जिल्हाप्रमुख ऐजे बोराडे यांच्या हस्ते देण्यात आले आहे.
दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे की शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या विचाराशी प्रेरित होऊन स्व. बाबासाहेब ठाकरे यांचे विचार व शिवसेना युवासेनाचे ध्येय धोरण गोरगरीब जनतेला फायदा होईल. असे काम करून शिवसेना पक्ष वाढीस कामे करावे. या नियुक्तीबद्दल माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, जिल्हाप्रमुख ऐजे बोराडे, पंडित भुतेकर, जिल्हा संघटक मोहन अग्रवाल, बाबासाहेब तेलगड, माधवराव कदम, अशोक आघाव, रामेश्वर नळगे, महेश नळगे, सुदर्शन सोळंके, विकास खरात, संदीप पाचारे, संजय  गोंडगे, दीपक हिवाळे, अनंता बागल, राहुल कदम, दत्ता सुरुंग, अबासाहेब कदम, मधुकर पाईकराव, गजानन सोळंके, आदींनी अभिनंदन केले आहे.   
 
*फोटो ओळी.. शिवसेना वाहन चालकमालक संघटनेच्या परतूर तालुका प्रमुख पदी रामजी सोळंके यांना नियुक्ती पत्र देतांना माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, जिल्हाप्रमुख ऐ. जे बोराडे, आदि,*

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत