नामदार श्री बच्चुभाऊ कडू यांचा वाढदिवस विविध कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आला -अशोक तनपुरे जिल्हा निरीक्षक प्रहार संघटना जालना
 परतुर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
दिनांक 5 /7 /2022 रोजी अपंग संघटनेचे संस्थापक व प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माननीय नामदार श्री. बच्चुभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त परतुर येथील ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना फळे वाटप व मूकबधिर विद्यार्थ्यांना शाळेमध्ये वह्या, पेन, वाटप तसेच महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते.
 असे विविध कार्यक्रम घेण्यासाठी परतुर प्रहार अपंग संघटनेचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर आढे, उपतालुका अध्यक्ष माऊली कदम यांनी पुढाकार घेतला तसेच तालुक्यातील संघटनेचे पदाधिकारी व अपंग बंधू भगिनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते असे अशोक तनपुरे जिल्हा निरीक्षक प्रहार संघटना जालना यांनी प्रसिद्धी पत्रकामध्ये माहिती दिली.
 
  
Comments
Post a Comment