बच्चू कडू यांच्या वाढदिवसा निमित्त प्रहार संघटनेच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन..अशोक तनपुरे जिल्हा निरीक्षक प्रहार संघटना जालना_
परतुर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
दिनांक 5 /7 /2022 रोजी अपंग संघटनेचे संस्थापक व प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माननीय नामदार बच्चु कडू यांच्या वाढदिवसानिमित्त परतुर येथील ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना फळे वाटप व मूकबधिर विद्यार्थ्यांना शाळेमध्ये वह्या, पेन, वाटप तसेच महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे
असे विविध कार्यक्रम घेण्यासाठी परतुर प्रहार अपंग संघटनेचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर आढे, उपतालुका अध्यक्ष माऊली कदम यांनी पुढाकार घेतला तसेच तालुक्यातील संघटनेचे पदाधिकारी व अपंग बंधू भगिनी या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. असे अशोक तनपुरे जिल्हा निरीक्षक प्रहार संघटना जालना यांनी प्रसिद्धी पत्रकामध्ये माहिती दिली.