आमदार बबनराव लोणीकर यांना मंत्रिमंडळात स्थान द्या कृष्णा आरगडे नगरसेवक यांची मागणी.


परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
परतुर येथील नगरसेवक मा. कृष्णा आरगडे यांनी परतूर मंठा मतदार संघाचे विद्यमान आमदार बबनरावजी लोणीकर यांना मंत्रिमंडळामध्ये परत एकदा मंत्री मंडळामध्ये स्थान देण्याची मागणी केली आहे गेल्या अडीच वर्षांपूर्वी देवेंद्र फडवणीस यांच्या सरकारमध्ये विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांच्याकडे महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आलेली होती.       ही जबाबदारी बबनराव लोणीकर साहेब यांनी संपूर्ण महाराष्ट्रात अत्यंत प्रभावीपणे पार पाडून पाणीपुरवठा योजनेच नातं जिवंत करण्याचे काम त्यांच्या हातून झालेला आहे .सतत दुष्काळात भरपळत असलेला मराठवाडा यासाठी कायमस्वरूपी उपाय म्हणून मराठवाडा वॉटर ग्रीड सारखी महत्त्वकांक्षी योजना आणून मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी खूप मोठे प्रयत्न त्यांनी केले असून परतूर मंठा तालुक्यात आमदार बबनराव लोणीकर यांच्या हातून विविध विकास कामे झालेली आहेत. प्रत्येकाच्या सुखदुःखाला हजर असणाऱ्या व चार ते पाच वेळा विधानसभा निवडणूक जिंकून आलेले आमदार बबनराव लोणीकर यांचा पुन्हा एकदा मंत्री मंडळात समावेश व्हावा ही परतुर तालुक्यातील तमाम जनतेची मागणी असल्याचे नगरसेवक कृष्णा आरगडे यांनी सांगितले..

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

सकल राजस्थानी समाज नवरात्र महोत्सवच्या अध्यक्ष पद्दी शरद भारुका तर सचिव: शुभम चित्तोडा यांची निवड