लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूरमध्ये विविध सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न ,नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून रुग्णांना फळे व ब्लँकेट वाटप, वृक्षारोपण तसेच अनाथ बालकांना अन्नदान

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा   दि. २२ जुलै : लोकनेते तथा महाराष्ट्राच्या राजकारणात जनसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे दिवंगत नेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.०० वाजता सरकारी दवाखाना, परतूर येथे करण्यात आली. यावेळी उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप  करण्यात आली. त्याचबरोबर रुग्णालय परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.  सकाळी ११.०० वाजता दृष्टी लॉयन्स, परतूर येथे रुग्णांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. गरजू व उपचाराधीन रुग्णांना आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले दुपारी १२.०० वाजता स्नेहांकुर अनाथ आश्रम येथे अनाथ व निराधार बालकांना अन्नदान करण्यात आले. बालकांसोबत प्रेमाने संवाद साधत त्यां...

समाजाच्या न्याय हक्कासाठी अहोरात्र समाजाचे काम करणार...प्रकाश सोनसळे अध्यक्ष धनगर समाज महाराष्ट्र राज्य


(बीड प्रतिनिधी)
       आज बीड येथे शासकीय विश्रामगृह याठिकाणी धनगर समाज महाराष्ट्र राज्य व बीड जिल्हा यांच्या वतीने मा.प्रकाश भैय्या सोनसळे अध्यक्ष धनगर समाज महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वाखाली आज बैठक घेण्यात आली होती. बैठकीचे अध्यक्ष रवींद्रजी गाडेकर (माजी सरपंच घुमरा पारगाव) प्रमुख पाहुणे सुदर्शन दादा भोंडवे, ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष उबाळे काका ,नारायण भोंडवे सरपंच डोंमरी यांच्या उपस्थितीमध्ये बैठक संपन्न झाली.
  या बैठकीमध्ये मार्गदर्शन करताना प्रकाश भैय्या सोनसळे यांनी सांगितले की समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी समाजाच्या अडीअडचणीसाठी धावून जाण्यासाठी समाजाच्या समस्या जाणून घेण्यासाठी युवकांनी व समाज बांधवांनी मला सहकार्य करावे मला साथ द्यावी समाजाच्या न्याय हक्कासाठी समाजाच्या हितासाठी अन्यायाच्या विरूद्ध लढण्यासाठी मी खंबीरपणे उभा आहे असे बोलताना सांगितले.
   यामध्ये चांगले काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला व समाजातील युवकांकडे काही जबाबदारी देण्यात आल्या.
   यावेळी भारत गाडे,शितलताई मतकर जिल्हाध्यक्ष,अरुण काकडे ,अविनाश भरणे, बाजीराव शिंदे,दत्ता गाडेकर, संदिप गाडेकर, नवनाथ डफळ, ईश्वर भोंडवे,दादा जायभाये, नितीन निर्मळ, ओंकार काळे, गुरव सर,नितेश गांगुर्डे, अक्षय खोटे,यश भोसले, प्रशांत काकडे,करण भोंडवे, तांबे भैय्या ,आदी समाज बांधव उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत