न्यू वंडर इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये गुरु पौर्णिमेच्या कार्यक्रम संपन्न

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा  न्यू वंडर इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज परतुर मध्ये गुरुपौर्णिमा निमित्त "जीवनातील गुरुचे महत्व" या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धेमध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी भाग घेतला तसेच इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनींनी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा या मंत्रावर शास्त्रीय पद्धतीने नृत्य सादर करून गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त केली.  नृत्य दरम्यान इयत्ता दहावीची विद्यार्थिनी संस्कृती संतोष झरेकर हिने जीवनातील गुरुचे महत्व सांगून शाळेतील सर्व शिक्षक वृंदाचे आभार मानले. या कार्यक्रमा दरम्यान संस्थेचे अध्यक्ष  नारायण  सोळंके ,संस्थेच्या सचिव छाया बागल तसेच व्हॉइस प्रिन्सिपल पूजा मोरे, शिक्षकवृंद व  शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

नागरीकांचे उपविभागिय पोलीस अधिकारीना निवेदन

परतुर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
शहरातील वाढत्या चोऱ्याच्या बदोबस्त करण्यात यावा या करीता साईबाबा मंदीर परीसरातील नागरीकानी एका निवेदन उपवीभागिय पोलीस अधीकारी यांना देण्यात आले
        दि.4/8/2022रोजी साईबाब परीसरातील  स्टेशन रोड वरील शेख नजीर यांचे ऑटो पार्ट्सचे दुकान मध्ये राञी चोरटयाने  फोडले या आगोदर माने याचे आडत दुकान फोडून तूर सोयबीन याची चोरी  केली तर  बंजरग गायकवाड यांचे गॅरेज चे शटर तोडून या गॅरेज मधील  पूर्ण माल पळविला या परिसरातील व्यापारी व नगरसेवक कृष्णा आरगडे यांनी पोलीस  उपविभागी अधीकारी यांना  निवेदन देऊन या भागात पेट्रोलिंग वाढवण्याची व  पोलीस बंदोबस्त देऊन या प्रकरणात लक्ष घ्यालण्याची ची मागणी केली 
या निवेदनावर नगरसेवक कृष्णा आरगडे, प्रभाकर सुपेकर, रोहीत ठाकुर, शेख शाकेर ,बाबा सुर्यवंशि, अनंता सागूळे, प्रल्हाद माने, आविनाश राऊत ,महादेव गायकवाड ,गजानन गायकवाड, राजू वाणी ,जी एम काळे ,कृष्णा सुभेदार संजय गोरे, मारोती वाघमारे ,विष्णू मोहीते ,गणेश,  नागेश जाधव ,एकनाथ कोल्हे, दिपक डाहाळे ,आकूश कातारे, हानूमान जगताप, आदी च्या स्वाक्षऱ्या आहेत.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत